भारताच्या दिग्विजय, प्रज्वल, करण, सिद्धार्थची आगेकूच
आयटीएफ टेनिस स्पर्धा
पुणे, ता. १५ ः सोलापूर येथे सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटना (एसडीएलटीए) आयोजित २५ हजार डॉलर रकमेच्या आयटीएफ पुरुष गट टेनिस स्पर्धेत स्वीडनच्या रेचटमन विन्सिगुएरा, डब्ल्यूने अव्वल मानांकित भारताच्या दक्षिणेश्वर सुरेशचा ७-६ (३), ६-४ असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली, तर भारताच्या दिग्विजय प्रतापसिंग, एस. डी. प्रज्वल देव, करण सिंग, सिद्धार्थ रावतने विजय मिळविले.
अखिल भारतीय लॉन टेनिस संघटना (एआयटीए), महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या (एमएसएलटीए) मान्यतेने सोलापूर येथील एमएसएलटीए टेनिस कोर्ट, जिल्हा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या एकेरीत भारताच्या चौथ्या मानांकित दिग्विजय प्रतापसिंगने प्रणव कार्तिकचा ४-६, ६-२, ६-१ असा, आठव्या मानांकित एस. डी. प्रज्वल देवने अर्णव पापरकरचा ६-४, ६-२ असा, तर तिसऱ्या मानांकित करण सिंगने अर्जुन राठीचा टायब्रेकमध्ये ६-४, ७-६ (५) असा, सातव्या मानांकित सिद्धार्थ रावतने मधवीन कामथचा ७-५, ६-३ असा पराभव केला.
दुहेरीत दक्षिणेश्वर सुरेश व मनीष सुरेशकुमार जोडीने एस. डी. प्रज्वल देव व नितीन कुमार सिन्हा या अव्वल मानांकित जोडीवर ७-६ (५), ६-४ असा अनपेक्षित विजय मिळविला.
निकाल : पुरुष गट : एकेरी ः दिग्विजय प्रतापसिंग (भारत) वि.वि. प्रणव कार्तिक (भारत) ४-६, ६-२, ६-१; एस. डी. प्रज्वल देव (भारत) वि.वि. अर्णव पापरकर (भारत) ६-४, ६-२; करण सिंग (भारत) वि.वि. अर्जुन राठी (भारत) ६-४, ७-६ (५); अधित्य गणेशन (अमेरिका) वि.वि. मान केशरवानी (भारत) ६-३, ६-७ (५), ६-१; सिद्धार्थ रावत (भारत) वि.वि. मधवीन कामथ (भारत) ७-५, ६-३; थानापट चॅनता (थायलंड) वि.वि. पावित सोर्नलॅक्सप (थायलंड) ३-६, ६-३, ६-४; समीर बॅनर्जी (अमेरिका) वि.वि. आदित्य बलसेकर (भारत) ७-५, ६-३; रेचटमन विन्सिगुएरा डब्ल्यू (स्वीडन) वि.वि. दक्षिणेश्वर सुरेश (भारत) ७-६ (३), ६-४.
दुहेरी गट : दक्षिणेश्वर सुरेश व मनीष सुरेशकुमार (भारत) वि.वि. एस. डी. प्रज्वल देव व नितीन कुमार सिन्हा (भारत) ७-६ (५), ६-४; गेरत जॉन्स व नोहा साचहतर (अमेरिका) वि.वि. अनुप बांगर्गी व अर्णव पापरकर (भारत) ६-२, ७-५, आदिल कल्याणपूर (भारत) व र्युकी मत्सुदा (जपान) वि.वि. थानापत चनता व पवीत सोर्नलकसुप (थायलंड) ६-२, ६-३; अधित्य गणेशन (अमेरिका) व ग्रिगोरी लोमकीन (कझाकस्तान) वि.वि. दिग्विजय प्रतापसिंग व जगमीतसिंग (भारत) ६-४, ६-४.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.