ITI  sakal
पुणे

ITI Education : व्यवसाय शिक्षणात मुलींचा कल ‘तंत्रज्ञ’ होण्याकडे

कारखान्यांमध्ये मुलांबरोबरच मुलीदेखील तंत्रज्ञ म्हणून काम करत असल्याचे दिसून येते.

मीनाक्षी गुरव

पुणे - एखाद्या कारखान्यात मोठ-मोठ्या यंत्रांसमोर वेल्डर, फिटर, तंत्रज्ञ म्हणून काम करताना काही वर्षांपूर्वीपर्यंत फक्त मुलेच दिसायची; परंतु आता तुम्हाला कारखान्यांमध्ये मुलांबरोबरच मुलीदेखील तंत्रज्ञ म्हणून काम करत असल्याचे दिसून येते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (आयटीआय) विविध तांत्रिक क्षेत्रातील तंत्रज्ञ किंवा कुशल कारागीर (टेक्निशियन) होण्यासाठी संबंधित व्यवसाय अभ्यासक्रम निवडण्याकडे मुलींचा कल वाढत आहे.

पुणे जिल्ह्यात शासकीय आयटीआयची संख्या १६ असून, त्यांची प्रवेश क्षमता साधारणत: पाच हजार ५०० आहे. तर जिल्ह्यातील ४५ खासगी आयटीआयमध्ये सहा हजार ५०० प्रवेश क्षमता आहे. प्रत्येक आयटीआयमध्ये एकूण प्रवेश क्षमतेच्या ३० टक्के जागा मुलींसाठी राखीव आहेत. तर जिल्ह्यात महिलांसाठी राखीव असणारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंधमध्ये असून, येथे २८०हून अधिक प्रवेश क्षमता आहे.

मुलींना व्यावसायिक आणि तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी आयटीआयमध्ये विशेष अभ्यासक्रम राबविले जातात. यामध्ये बेसिक कॉस्मोटोलॉजी, ड्रेस मेकिंग, फ्रुट्‌स ॲण्ड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, इंटेरियर डेकोरेशन ॲण्ड डिझायनिंग अशा पारंपरिक अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यु. के. सूर्यवंशी म्हणाले, ‘विद्यार्थिनी फळे आणि भाजीपाला प्रक्रिया, कॉस्मोटोलॉजी, फॅशन टेक्नॉलॉजी, शिलाई तंत्रज्ञ या पारंपरिक व्यवसाय अभ्यासक्रमांबरोबरच कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग असिस्टंट, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक अशा अभ्यासक्रमांना पसंती देत आहेत. अभियांत्रिकीसह वेल्डर, मशिनिस्ट याकडे त्यांचा वाढता कल आहे.’’

मुलींमध्ये हवी व्यवसाय शिक्षणाबाबत जागरूकता

आयटीआयच्या प्रवेशात मुलांचे प्रमाण हे एका जागेसाठी पाच अर्ज म्हणजेच १:५ असे असते, तर मुलीचे प्रमाणे १: २/३ असे असते. प्रवेश प्रक्रियेअखेरीसपर्यंत मुलींच्या जागा भरल्या जातात. परंतु, मुलींचा कल पारंपरिक शिक्षणाकडे सर्वाधिक असतो. परंतु, पदवी अभ्यासक्रमानंतर नोकरी न मिळाल्याने पुन्हा आयटीआय करणाऱ्या मुलींचे प्रमाणही लक्षणीय आहे. त्यामुळे रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या या अभ्यासक्रमाबाबत मुलींमध्ये आणखी जागृती निर्माण करण्याची गरज असल्याचे भिलेगावकर यांनी अधोरेखित केले.

पारंपरिक अभ्यासक्रमांबरोबरच कॉम्प्युटर हार्डवेअर ॲण्ड नेटवर्क मेंटेनन्स, कॉम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टिम मेन्टेनन्स, टेक्निशियन पॉवर इलेक्ट्रॉनिक्स सिस्टिम अशा अभ्यासक्रमांना मुलींचा वाढता कल असल्याचे दिसून येते. हे अभ्यासक्रम केल्यानंतर कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळते. शिक्षणानंतर लगेचच रोजगाराची किंवा व्यवसायाची संधी उपलब्ध होते. म्हणून, विद्यार्थिनी व्यवसाय अभ्यासक्रमांकडे वळत असल्याचे दिसून येते.’

- आय. आर. भिलेगावकर, प्राचार्य, शासकीय आयटीआय (मुलींची), औंध

ग्रामीण भागात आयटीआयच्या अभ्यासक्रमासाठी मुलींना तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. तसेच, ग्रामीण भागात फारसे व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध होत नाहीत. त्याउलट शहरी भागातील आयटीआयमध्ये विविध अभ्यासक्रम उपलब्ध होतात. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलींचा आयटीआयमध्ये प्रवेश घेण्याचा कल कमी होत असून, शहरी भागात मुलींच्या प्रवेशाचे प्रमाण वाढले आहे.

- सोमनाथ पुरी, प्राचार्य, शासकीय आयटीआय (भोर)

‘आयटीआय’ची संख्या व प्रवेश क्षमता

  • ४१८ - राज्यातील एकूण शासकीय आयटीआय

  • ५७४ - राज्यातील एकूण खासगी आयटीआय

  • १६ - पुणे जिल्ह्यातील शासकीय आयटीआय

  • ४५ - पुणे जिल्ह्यातील खासगी आयटीआय

  • ५,५०० - प्रवेश क्षमता

  • ६,५०० - प्रवेश क्षमता

  • १२,००० - जिल्ह्यातील एकूण प्रवेश क्षमता

औंध शासकीय आयटीआय

जिल्ह्यातील महिलांसाठी एकमेव राखीव आयटीआय

२८०+ - प्रवेश क्षमता

३०% - सर्व आयटीआयमध्ये एकूण प्रवेश क्षमतेच्या महिलांसाठी राखीव जागा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT