Itians
Itians 
पुणे

का उतरले आयटीयन्स रस्त्यावर?

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - हिंजवडी आयटीपार्क परिसरातील खराब रस्त्याची दुरुस्ती तातडीने करावी, अशी मागणी सातत्याने होते. मात्र, प्रशासनाकडून त्याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे हैराण झालेल्या आयटीयन्सनी याकडे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढील आठवड्याच्या अखेरीस शिवाजी चौक आणि भूमकर चौकात आयटी कर्मचारी फलक घेऊन मोहीम राबविणार आहेत. रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत ही मोहीम राबविणार असल्याचे फोरम फॉर आयटी एम्प्लाईजचे (फाइट) अध्यक्ष पवनजित माने यांनी सांगितले. 

अशी आहे स्थिती
हिंजवडी आयटी पार्कमध्ये भूमकर चौक आणि शिवाजी चौकाकडून जाणारा रस्ता अनेक ठिकाणी उखडला आहे. पावसाळ्यात तो खराब झाला आहे. पावसाळा संपूनही महिन्याभराचा कालावधी उलटून गेला. मात्र, स्थानिक प्रशासनाने अद्यापही त्याची दुरुस्ती केली नाही. तसेच सतत सुरू असणारी वाहनांची ये-जा यामुळे येथे धुळीचे साम्राज्य आहे. त्यामुळे या रस्त्याचा वापर करणाऱ्या आयटीयन्सच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शिवाजी चौक परिसरातील रस्त्यांची अशीच परिस्थिती आहे. काही दिवसांपासून आयटी कंपन्यांमधील कर्मचारी या रस्त्यांबाबतची कैफियत फाइटकडे मांडत आहे. त्यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याचे ठरवले आहे. आयटी पार्ककडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्तेही खराब झाला आहेत. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी लवकरच मोहीम राबवणार असल्याचे फाइटने स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

Viral Video: शिक्षिकेची गुंडागर्दी! शेजारच्या घरात घुसून गोंधळ, लहान मुलासह तीन जखमी.. व्हिडिओ व्हायरल

International Labour Day : राजीनाम्यानंतर नोटीस कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे का? काय सांगतो नियम

Harshaali Malhotra: 'बजरंगी भाईजान' मधली मुन्नी आठवते? आता ओळखणंही झालंय कठीण, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात...

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

SCROLL FOR NEXT