पुणे

कोलकत्यात विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारी

CD

कोलकता, ता. २० (पीटीआय) : पश्‍चिम बंगालमधील जादवपूर विद्यापीठाच्या परिसरात गुरुवारी पहाटे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांच्या सदस्यांमध्ये हाणामारी झाली. दोन्ही गटांनी एकमेकांवर विद्यापीठाच्या परिसरात बाहेरील व्यक्तींना आणल्याचा आरोप केला आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
‘‘हा प्रकार अत्यंत चुकीचा असून, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल,’’ असे विद्यापीठाचे कुलगुरू चिरंजीव भट्टाचार्य यांनी स्पष्ट केले. तसेच, संध्याकाळनंतर बाहेरील व्यक्तींना विद्यापीठ परिसरात प्रवेश करण्यास निर्बंध घालण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या हाणामारीत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून, त्यातील काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दक्षिण कोलकत्यातील विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या परिसरात काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्याचीही माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.
वाद कशावरून?
विद्यापीठाच्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यार्थी संघाच्या (एफईटीएसयू) बुधवारी झालेल्या बैठकीवरून हा वाद सुरू झाला आणि रात्री उशिरापर्यंत तो सुरूच होता, असे विद्यापीठाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. तणाव वाढत असताना जादवपूर विद्यापीठाची प्रशासकीय इमारत असलेल्या अरविंद भवनाला कुलूप लावण्यात आले आणि त्याबाहेर मोठ्यासंख्येने विद्यार्थी जमा झाले होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या ‘अभाविप’ने आरोप केला की, एफईटीएसयूच्या बैठकीच्या आडून स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया एसएफआय, डीएसओ-डीएसएफसह डाव्या विद्यार्थी संघटनांच्या सदस्यांनी संघर्ष सुरू केला. तर, ‘अभाविप’ने विद्यापीठ परिसरात बाहेरील व्यक्तींना आणून तोडफोड केल्याचा आरोप डाव्या संघटनांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missing Link Accident: मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक, ६ ते ७ जण जखमी

Inspirational Story: दोन्ही हात नसतानाही हार मानली नाही; माउली बनली महापालिकेची लिपिक, औक्षणाचा क्षण ठरला भावनिक

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

नवरा-मुलीचा मृत्यू, समाजाचे टोमणे अन् डोळ्याला दुखापत; तरीही RAS मध्ये मिळवलं मोठं यश.... रोहिणी गुर्जर यांची जिद्दीची कहाणी

Maharashtra Weather : ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम, मात्र काही जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट; जाणून घ्या IMD चा अंदाज

SCROLL FOR NEXT