shivdurg sanghatana 
पुणे

पुणे : 'जगदंबा तलवार परत आणा'; गहुंजे स्टेडिअममध्ये घुसले कोल्हापूरचे तरुण

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती शिवाजी महाराज यांची ऐतिहासिक जगदंबा तलवार (Jagdamba Talwar) इंग्लंडकडून भारताला परत मिळावी अशी मागणी सतत्याने लावून धरणाऱ्या कोल्हापूरातील शिवदुर्ग संघटनेच्या सदस्यांनी आज (मंगळवार) सकाळी पुण्यातील गहुंजे (Gahunje) येथील क्रिकेट स्टेडिअमवर ठिय्या आंदोलन केले. यावेळी मैदानात घुसून घोषणाबाजी करणाऱ्या पाच जणांवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

पोलिसांच्या माहितीनुसार, हर्षल अशोक सुर्वे (वय ४२), प्रदीप पांडुरंग हांडे (वय ३६), विजय सुभाष दरवान (वय ४७), देवेंद्र नंदकुमार सावंत (वय ३०) आणि आशिष चंद्रशेखर अष्टेकर (वय ३१) सर्वजण राहणार कोल्हापूर या 'शिवदुर्ग'च्या पाच सदस्यांवर साथ रोग अधिनियम १८९७ कलम ३ सह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

हे पाच जण बेकायदा पद्धतीने एकत्र येऊन गहुंजे स्टेडियमच्या वॉचमनला जबरदस्ती करत मैदानात प्रवेश केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच घोषणाबाजी करत मैदानात प्रवेश करुन स्टेडिअमच्या कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण केल्याच्या आरोपांखाली या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्वजण ज्या कारमधून गहुंजे स्टेडिअम येथे आले होते ती कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. 

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली जगदंबा तलवार इंग्लंड येथील राणीच्या वैयक्तिक संग्रहालयात रॉयल कलेक्शन ट्रस्ट येथे ठेवण्यात आली आहे. ही तलवार परत आणण्यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री यांना मेल आणि पत्रे पाठवण्यात आली आहेत. मात्र, आद्याप त्याची दखल घेतली गेली नसल्याने पुण्यात २३ मार्च रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यावेळी निदर्शने करण्याचा इशारा शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाचे प्रमुख हर्षल सुर्वे यांनी कोल्हापूरात दिला होता.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT