Jagdish-Mulik.jpg 
पुणे

Vidhan Sabha 2019 : वडगाव शेरीत नागरिकांसाठी शेकडो ओपन जीम सुरु : जगदीश मुळीक

सकाळ वृत्तसेवा

वडगाव शेरी : ''बदलत्या जीवनशैलीत आरोग्यसाधना करणे अत्यावश्यक झाले आहे. जिममध्ये जाऊन व्यायाम करण्यासाठी अनेक मर्यादा येतात. सामान्य नागरिकांना त्यांच्या घराजवळ सहजपणाने व्यायाम करता यावा. यासाठी मतदार संघामध्ये शेकडो ओपन जीम सुरू करण्यात आले असल्याची'' माहिती भाजप महायुतीचे आमदार जगदीश मुळीक यांनी दिली.

वडगावशेरी मतदार संघातील भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप आणि शिवसंग्राम या महायुतीचे उमेदवार आमदार जगदीश मुळीक यांनी आज बरमाशेल, फाइव्ह नाईक चौक, टिंगरे नगर, सिद्धेश्वर नगर, सावंत पेट्रोल पंप आणि भीमनगरमध्ये पदयात्रेव्दारे प्रचार केला.  

यावेळी मुळीक म्हणाले, ''कामामुळे तसेच अनेक कारणामुळे नागरिकांना व्यायाम करता येत नाही. व्यायाम शाळेत जाणे आर्थिकदृष्टया परवड नाही. त्यामुळे नागरिकांना मोफत व्यायाम करता यावा. यासाठी उद्यान तसेच सार्वजनिक ठिकाणी ओपन जीम सुरू केले आहेत. या ओपन जीममध्ये अनेक प्रकारचे व्यायाम करता येत आहे. या ओपन जीमचा वापर तरुण, महिला तसेच वयोवृध्द करत आहे. व्यायामामुळे मतदार संघातील नागरिकांचे आरोग्य सुधारणार आहे. व्यायामामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभते. मनातील व शरीरावरील ताण-तणाव कमी होतो. कॉमर्स झोन ते सावंत पेट्रोल पंप असा महत्वपूर्ण रस्ता खुला केला. या परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विश्रांतवाडी चौकात उड्डाणपूल उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजु, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, नगरसेवक कर्णे गुरुजी, नाना सांगडे, शीतल सावंत, राहुल भंडारे, फरजाना शेख, चंद्रकांत जंजिरे, विशाल साळी, सुधीर गलांडे, माजी नगरसेवक भगवान जाधव, भीमराव खरात, सागर माळकर, सुनील गोगले, अजय सावंत, अजहर खान, तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहने करेक्ट कार्यक्रम केला! बेन स्टोक्स, जो रूटचा चतुराईने उडवला त्रिफळा; वोक्सही OUT

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठीचा आदर राखत अभिनेत्याने जिंकली कानडी मने

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT