पुणे

आचार्य पदपूजेने भक्तिरसात रंगला आत्मोद्धार चातुर्मास

CD

PNE26W41141
फोटोओळ : सोलापूर : त्रिदिवसीय देव-गुरू भक्ती महोत्सवाच्या पहिल्या दिवशी जोडभावी पेठेत आचार्य पदपूजेत सहभागी जैन श्रावक-श्राविका.


आचार्य पदपूजेने भक्तिरसात रंगला आत्मोद्धार चातुर्मास
त्रिदिवसीय देव-गुरू भक्ती महोत्सवाचा प्रारंभ; साध्वी अक्षयश्रीजींचा ‘केसरकुल दीपिका’ उपाधीने सन्मान

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १० : जोडभावी पेठेतील श्री आदेश्वर जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघात सुरू असलेल्या आत्मोद्धार चातुर्मासात रविवारी भक्ती आणि श्रद्धेचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. महान जैनाचार्य, महाराष्ट्र देशोद्धारक पूज्यपाद आचार्य देव श्रीमद् विजय रामचंद्र सूरीश्वरजी महाराज यांच्या ३५व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित त्रिदिवसीय देव-गुरू भक्ती महोत्सवाची सुरुवात आचार्य पदपूजेने झाली. सुंदर सजावट, विविध फळे व नैवेद्याच्या द्रव्यांनी केलेली अर्पणसेवा आणि संगीतमय भक्तीने मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
विविध लाभार्थी कुटुंबांच्या वतीने करण्यात आलेल्या पदपूजेला पूज्य मुनिश्री प्रशांतरत्नविजयजी महाराज यांच्यासह साधू-साध्वीजींचे सानिध्य लाभले. कनूभाई गुरुजी यांनी विधी-विधानानुसार पूजा करवून घेतली. चेतनभाई बाफना यांच्या सुरेल संगीताने भक्तिमय वातावरणाला रंगत आणली. आचार्यांच्या स्मृतींना वंदन करत भाविकांनी भक्तिभावाने सहभाग घेतला.
----------------------
साध्वी अक्षयश्रीजींचा ‘केसरकुल दीपिका’ उपाधीने सन्मान
वे ऑफ लाइफच्या प्रणेत्या परमपूज्य अक्षयश्रीजी महाराज यांचा ७१वा वाढदिवस बलिदान चौकातील जैन स्थानकात जप, तप, उपवास आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा झाला. यावेळी त्यांना ‘केसरकुल दीपिका’ उपाधी व अभिनंदनपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. दिव्यांग बंधू-भगिनींचा शाल व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. ‘अक्षय सत्तरी’ पुस्तिकेचे प्रकाशन, जीवनपटाचे सादरीकरण आणि नवपद जपाची आराधना झाली. कल्पना भन्साळी यांनी ७१०० लाडू गोशाळेस अर्पण केले. जैन स्थानकवासी संघाचे अध्यक्ष पदम राका यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांनो लक्ष द्या! Meesho वरून खरेदी करता? तर आधी 'ही' बातमी नक्की वाचा; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Video: "मला नरेंद्र नावाचा तिरस्कार...", PM मोदींना भारतीय बॉक्सरने सांगितलेला पाकिस्तानी खेळाडूचा किस्सा ऐकून आवरेना हसू

Sugar Price: राज्यात साखरेचा तुटवडा, सणासुदीत भाव आणखी भडकण्याची शक्यता, किलोमागे किती मोजावे लागणार?

Samruddhi Mahamarg News: महामार्गावर नेमकं काय घडलं? RTO अधिकाऱ्यांनी केला मोठा खुलासा; म्हणाले, ''ट्रक चालकाने...''

Tukaram Mundhe: “चहा घेणार का? मी बनवतोय" FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ज्याच्यासाठी बनवला चहा तो मित्र कोण?

SCROLL FOR NEXT