पुणे

हेड जयशंकर यांचा आजपासून परदेश दौरा

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.२ ः परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे उद्यापासून (ता.३) पाच सप्टेंबरपर्यंत युक्रेन आणि पोलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या तीन दिवसीय दौऱ्यामध्ये ते युक्रेनचे परराष्ट्रमंत्री आंद्री सिबिहा आणि पोलंडचे उपपंतप्रधान तथा परराष्ट्रमंत्री राडोस्लाव सिकोरस्की यांच्यासोबत चर्चा करतील, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून आज सांगण्यात आले.
युक्रेन संघर्षामध्ये ‘अंतहीन युद्धा’कडून ‘युद्धाच्या समाप्ती’कडे वळण्याचे आवाहन मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना केल्यानंतर जयशंकर यांचा हा युक्रेन दौरा महत्त्वपूर्ण मानला जातो. या दौऱ्यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार जयशंकर यांच्या दौऱ्याचा उद्देश युक्रेन आणि पोलंडसोबतचे भारताचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणे हा आहे. ते प्रादेशिक घडामोडी आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांवरही इतरांशी संवाद साधतील.


‘भारताची भूमिका मांडणार’
- युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांसमवेत होणाऱ्या बैठकीमध्ये जयशंकर हे युक्रेन-रशिया युद्धाबाबत भारताची भूमिका मांडतील. दरम्यान, दिल्लीमध्ये १२ आणि १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या अठराव्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या काही दिवस आधी जयशंकर यांचा दौरा पार पडत आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या शिखर परिषदेमध्ये रशियाचे अध्यक्ष पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, इराणचे अध्यक्ष पेजेश्कियान यांच्यासह अन्य नेते सहभागी होऊ शकतात.


युद्ध थांबविण्याचे आवाहन
- बिश्केक येथे ३१ ऑगस्ट रोजी ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’च्या शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष पुतीन यांची भेट झाल्यानंतर परराष्ट्रमंत्र्यांचा हा युक्रेन दौरा पार पडत आहे. या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी रशिया- युक्रेन संघर्ष सोडविण्यासाठीच्या सर्व शांततापूर्ण प्रयत्नांना भारताचा पाठिंबा दर्शविताना युद्ध थांबविण्याचे आवाहन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : सकल मराठा समाजाकडून लातूर जिल्हा बंदची हाक; मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा

Maratha Reservation : पाण्याच्या टाकीवर चढून पेट्रोलची बाटली हातात घेत उपोषण; मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन

Lohgaon News : संसाराची जबाबदारी सांभाळत जिद्दीने अभ्यास; धुपखेड्याच्या सुनेची नागपूर जिल्हा परिषदेत शिक्षिका म्हणून निवड

Marathi News Live Updates : लक्ष्मण हाकेंनी आंदोलन मागे घेतलं, बावनकुळेंशी फोनवरून चर्चा केल्यानंतर घेतला निर्णय

'तो फोटो चोरला अन् आईने खूप मारलं' जितेंद्र जोशी बालपणीची आठवण सांगताना म्हणाले...'मामाने पट्ट्यानं आणि आईनं चपलेनं...'

SCROLL FOR NEXT