पुणे

नगर : जखणगावात विविध मागण्यासाठी सोमवारपासून उपोषण, ग्रामस्थ सहभागी होणार

CD

जखणगावात आजपासून उपोषणाचा इशारा
--
रस्ते, पाणीपुरवठा, लोडशेडिंगच्या प्रश्नांवर ग्रामस्थ आक्रमक
--

ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर : तालुक्यातील जखणगाव येथे विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार (ता. १९) पासून ग्रामस्थ उपोषण करणार आहेत. गावातील हटकेश्वर सभागृहात सर्व सदस्य व ग्रामस्थांच्या सहभागातून उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच डॉ. सुनील गंधे यांनी दिली.

याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे. महावितरणकडून ग्रामीण भागात सुरू असलेले सायंकाळचे लोडशेडिंग तातडीने बंद करावे, वाड्या-वस्त्यांवरील सिंगल फेजिंगचे काम पूर्ण करावे, जलजीवन मिशनअंतर्गत अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करावीत, बुऱ्हाणनगर पाणी योजनेतून होणारा पाणीपुरवठा नियमित करावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

तसेच स्मशानभूमीसाठी शासनाने दिलेली जागा मोजून अतिक्रमणमुक्त करावी, गावातील शिवरस्ते, शिवार रस्ते आणि अन्य रस्ते मोजून वाहतुकीसाठी खुले करावेत, अशीही मागणी आहे. गावात सुमारे सहा शिवरस्ते, आठ वस्ती रस्ते असून राष्ट्रीय महामार्गही गावातून जातो. मात्र अनेक रस्त्यांवर अतिक्रमण असल्याने शेतकऱ्यांना वाहतूक करताना अडचणी येत आहेत. याबाबत अनेक वेळा अर्ज, ठराव व निवेदने देऊनही कामे मार्गी लागलेली नाहीत, असे डॉ. गंधे यांनी सांगितले.

ग्रामविकासाच्या कामांमध्ये या प्रलंबित प्रश्नांमुळे अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी रात्री आठ वाजता हटकेश्वर सभागृहात विशेष ग्रामसभा होणार आहे. तोपर्यंत प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्यास ग्रामसभेनंतर सदस्य व ग्रामस्थ त्याच ठिकाणी आमरण उपोषणास बसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झारखंड विद्यार्थी आंदोलनापुढे सरकार झुकलं! JSSC CGL परीक्षा रद्द; मुख्यमंत्री सोरेन यांची मोठी घोषणा

Karad News : कऱ्हाडचे अमोल होमकर सीआरपीएफचे महानिरीक्षक; संवेदनशील मणिपूर, नागालँडची जबाबदारी

Koregaon News : वडिलांची चित्रकला जपतोय मुलगा! बारावीतील अवधूत साकारतोय अनेक मान्यवरांची हुबेहूब पोर्ट्रेट

Donald Trump: इराणशी गुप्त चर्चेमागे कोण? ट्रम्प प्रशासनाने IRGC पर्यंत कशी पोहोच मिळवली? सीक्रेट कनेक्शन आलं समोर

MPSC Exam : जिद्द अन् परिश्रमातून यश; कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड

SCROLL FOR NEXT