पुणे

जलजीवनच्या कागदावरील पूर्ततेचा खेळ बंद करा!

CD

जलजीवनच्या कागदावरील पूर्ततेचा खेळ बंद करा
अमोल खताळ ः गावनिहाय आढाव्यानंतर वरिष्ठ स्तरावर घेणार बैठक
संगमनेर, ता. ६ ः जलजीवन मिशनच्या योजना कागदोपत्री ९० ते १०० टक्के पूर्ण झाल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी आहे. अनेक गावांमध्ये छोट्या-छोट्या अडचणींमुळे या योजना बंद आहेत. त्यामुळे जलजीवन मिशनच्या कागदावरील पूर्ततेचा खेळ आता बंद करा. पुढील आठ दिवसात प्रत्येक कार्यकर्त्याने ज्या-ज्या गावात जलजीवन मिशनच्या योजना सुरू आहेत, त्या योजनांची सद्यःस्थिती जाणून घेऊन त्याचा अहवाल पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व आपल्याकडे द्यावा. त्यानंतर वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन या योजनांमधील अडचणी सोडविण्यात येतील, असे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.
आमदार खताळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की सध्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. काही ठिकाणी टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे. अशा परिस्थितीत जलजीवन मिशनच्या योजना कार्यान्वित असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, अधिकाऱ्यांकडून जलजीवन मिशनची कामे ९० ते १०० टक्के पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी योजना बंद असून काही ठिकाणी केवळ किरकोळ अडचणींमुळे पाणीपुरवठा सुरू झालेला नाही.
या योजना सुरू झाल्यास संबंधित गावांमधील पाणीप्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रलंबित कामे व तांत्रिक अडचणी तातडीने दूर करणे गरजेचे आहे.
केवळ कागदोपत्री कामे पूर्ण झाल्याचे दाखवून उपयोग नाही, तर प्रत्यक्षात गावातील नागरिकांना पाणी मिळते का, याची पाहणी करणे आवश्यक आहे, सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी गावांमध्ये थांबून नागरिकांच्या अडचणी समजून घेणे आवश्यक आहे. मागील टंचाई आढावा बैठकीस अनेक अधिकारी उपस्थित नव्हते. टंचाईसारख्या गंभीर प्रश्नाबाबतही अधिकारी व संबंधित यंत्रणा गंभीर नसतील, तर येत्या काळात पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे निष्काळजीपणा व हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करावी लागेल, असा इशाराही आमदार खताळ यांनी दिला.
----
पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने पुढील पावसाळा सुरू होईपर्यंतची परिस्थिती लक्षात घेऊन आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे. टँकर, पाणीपुरवठा योजना, चारा उपलब्धता आणि गावनिहाय आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेऊन प्रशासनाने त्यानुसार कार्यवाही करावी. जलजीवन मिशनच्या ज्या योजना प्रत्यक्षात बंद आहेत, त्या तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.
- अमोल खताळ, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premanand Maharaj Ashram Death : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातील शिष्याच्या मृत्यूचे गूढ वाढले; मोबाईल, मानसिक स्थितीची पोलिसांकडून चौकशी

Transport & Logistics Reform : देशातील वाहतूक कोंडी आणि लॉजिस्टिक्स खर्चावर तोडगा! केंद्र सरकार स्थापन करणार 'एकात्मिक वाहतूक आणि लॉजिस्टिक्स प्राधिकरण'

IND vs WI, 1st T20I: नमन धीरला पदार्पणाची संधी, वैभवची निवड झाली की नाही? पाहा कशी आहे भारताची Playing XI

Marathi News Live Updates: कत्तलीसाठी गायी नेत असल्याच्या संशयावरून टेम्पो अडविला; दोघे ताब्यात

Satana News : दुष्काळ जाहीर; मात्र शेतकरी डिजिटल चक्रव्यूहात, सातबारा अन् ‘फार्मर आयडी’साठी संकेतस्थळे ठप्प

SCROLL FOR NEXT