सोलापूर जिल्ह्यात जलजीवन मिशनमध्ये माळशिरस आघाडीवर
-उत्तर सोलापूर पिछाडीवर; जिल्ह्यात ५८२ योजना अद्याप अपूर्ण
ॲग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर : ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या ''जलजीवन मिशन''च्या कामांमध्ये सोलापूर जिल्ह्यात मोठी तफावत दिसून येत आहे. तालुकानिहाय प्रगतीत माळशिरस तालुका आघाडीवर असून, उत्तर सोलापूर तालुका सर्वात पिछाडीवर राहिला आहे. जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधील १ हजार ३२९ योजनांपैकी केवळ ७४७ योजना पूर्ण झाल्या असून, अद्याप ५८२ योजनांची कामे अपूर्णच आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ५६ टक्के कामे मार्गी लागली आहेत. यात माळशिरस तालुक्याने सर्वाधिक १२४ योजना पूर्ण करत जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे. त्याखालोखाल बार्शी (९५), सांगोला (८८) आणि मंगळवेढा (७५) या तालुक्यांनी कामांत चांगली गती राखली आहे. दुसरीकडे, सोलापूर शहरालगतच्या तालुक्यांमध्ये कामांचा वेग अत्यंत मंदावला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात मंजूर ४० योजनांपैकी अवघ्या १३ योजनांचीच कामे पूर्ण होऊ शकली आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्याची स्थितीही फारशी समाधानकारक नसून, तेथील ९४ पैकी केवळ ४१ योजना पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट असतानाही निधीअभावी या योजना रखडल्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. कामांच्या या संथगतीमुळे योजना पूर्ण होऊन प्रत्यक्ष नळाला पाणी येण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
----------------------
चौकट-१
अपूर्ण ५८२ योजनांची स्थिती :
-------------------
सुरू न झालेल्या योजना: २
० ते २५ टक्के पूर्ण: ६७ योजना
२५ ते ५० टक्के पूर्ण: ९६ योजना
५० ते ७५ टक्के पूर्ण: २०७ योजना
७५ ते १०० टक्के पूर्ण: २१० योजना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.