जलतारा प्रकल्पांतर्गत
शोषखड्ड्यांची निर्मिती करा
बीड जिल्हाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन
ॲग्रोवन वृत्तसेवा
बीड : जलतारा प्रकल्पांतर्गत पाण्याचा योग्य निचरा करून भूजल पातळी वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतामध्ये शोषखड्ड्यांची निर्मिती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात चारा लागवड, जलतारा प्रकल्प व व्हीबी-जी राम जी अंतर्गत दुष्काळ निवारण कामांचा आढावा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी घेतला. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी तसेच सर्व तहसीलदार व गटविकास अधिकारी ऑनलाइन पध्दतीने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जॉन्सन म्हणाले, जलतारा प्रकल्पांतर्गत शोषखड्ड्यांचा आकारमान व रचनेमुळे शेतातून वाहून जाणारे पावसाचे पाणी एकत्र होते. खड्ड्यातील खडीच्या थरांमुळे हे पाणी फिल्टर होऊन जमिनीत खोलवर मुरते, ज्यामुळे भूजल पातळीत झपाट्याने वाढ होण्यास मदत होते. जॉबकार्डच्या उपलब्धतेनुसार प्रत्येक गावात वर्षाला ५० पेक्षा जास्त जलतारा कामे घेण्याची सवलत आहे.
जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्य चारा पिके, कमी पाण्यासाठी योग्य असणारे वाण आणि कमी कालावधीत जलद उत्पादन देणाऱ्या पिकांची सविस्तर माहिती जाणून घेत त्यांनी योग्य त्या सूचना केल्या.
यावेळी जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या घरकुल, विहीर आणि जलतारा प्रकल्पाच्या कामावर कार्यरत असलेल्या मजुरांच्या उपस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना दुष्काळ निवारण विषयक कामे प्राधान्याने हातळण्याच्या सूचनाही केल्या.
.... फोटो B17842 ...
बीड : जिल्हाधिकारी कार्यालयात चारा लागवड, जलतारा प्रकल्प व व्हीबी-जी राम जी अंतर्गत दुष्काळ निवारण कामांच्या आढावा बैठकीला उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.