पुणे

पाणी पुरवठ्याचा ५८ गावातील ४४० वाड्यावस्त्याचा संभाव्य टंचाई आराखडा सादर पाणीपुरवठा अभियंता एस एन करवते यांची माहिती

CD

MLS26B02591
जळभावी (ता. माळशिरस) ः येथील तांबूळ तलावाची स्थिती.

माळसिरसमध्ये तलाव अन् बंधाऱ्यांत ४० टक्के पाणीसाठा
गतवर्षी चार गावांमध्ये होता टॅंकरने पाणीपुरवठा; संभाव्य टंचाई आराखडा तयार

अशोक सिदवाडकर ः सकाळ वृत्तसेवा
माळशिरस, ता. २२ ः तालुक्यातील सर्वच गावातील पाण्याची सध्याची स्थिती चांगली असून, तालुक्यातील एकूण ८४ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, २१ गाव तलाव आणि ९९ पाझर तलावांमध्ये ३० ते ४० टक्के पाणीसाठा आहे. मार्चपर्यंत तरी पाणीटंचाई भासणार नसल्याची स्थिती आहे.
गतवर्षी मार्चमध्येच चार गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. यावर्षी मार्चनंतर डिसेंबरअखेर ५८ गावांतील ४४० वाड्या-वस्त्यांवर संभाव्य पाणी टंचाई भासणार असून, त्याचा आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती पाणीपुरवठा अभियंता एस. एन. करवते यांनी दिली.

गतवर्षी तालुक्यात मार्चमध्ये गारवाड, मगरवाडी, सुळेवाडी, बचेरी या ४ गावांत तर एप्रिलमध्ये शिंगोर्णी, शिवारवस्ती, निटवेवाडी, पळस ६ तर मे महिन्यात मंडळ, भांब, फडतरी या सहा गावांमध्ये तर मे महिन्यानंतर लोंढे-मोहितेवाडी, कदमवाडी, लोणंद, जळभावी, पठाणवस्ती या सहा असे एकूण १६ टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता.
गतवर्षी सरासरीपेक्षा जास्त झालेल्या पावसामुळे सध्या पाण्याची स्थिती चांगली आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून काही गावांमध्ये टंचाई भासू शकते. यासाठी संभाव्य टंचाई आराखडा सादर करण्यात आला आहे. आजअखेर तरी कोणत्याही गावाचा प्रस्ताव आला नसल्याची माहिती करवते यांनी दिली.

तालुक्यातील पाणीसाठ्याची स्थिती
तालुक्यात ८४ केटी वेअर असून त्याची साठवण क्षमता १२ हजार ३७१ टीएमसी आहे. २१ गाव तलाव, ९९ पाझर तलाव, १७२ सिमेंट बंधारे आहेत. यामध्ये सध्या ३० ते ४० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तालुक्यात ९ पाझर तलावाची दुरुस्ती, ४ सिमेंट बंधाऱ्याची दुरुस्ती तर इस्लामपूर येथे एका नवीन बंधाऱ्याचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती लघु पाटबंधारे उप अभियंता तेजस चिखलीकर यांनी दिली.

शेतीसाठी पाणी उपसा न केल्यास टँकर लागणार नाही
जळभावी गावाला सातत्याने टँकरने पाणी पुरवठा करावा लागत होता. परंतु गेल्या दोन वर्षांपासून गावाने सर्वानुमते तलावातील पाणी उपसा न करण्याचा निर्णय घेतल्याने गावठाणास पाण्यासाठी टँकरची गरज लागली नाही. यावर्षीही पाणी उपसा न केल्यास पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लागणार लागल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maoist Song Dance Pune: पुण्यातील वसतिगृहात माओवादी आशय असलेल्या गाण्यावर नृत्य; Video Viral

SBI Whatsapp : स्टेट बँकेत अकाऊंट आहे? तुमच्यासाठी मोठी खुशखबर; घरबसल्या व्हॉट्सॲपवर होणार सगळं काम, पाहा काय आहे नवी सुविधा

Latest Marathi News Update: नऱ्हे येथे पीएमपी बस अपघात; चालकाला फिट आल्याने बस कठड्यावर धडकली

स्वतः वाघ्या म्हणून काम केलं, महिलांचं शोषण जवळून पाहिलं; दिग्दर्शक अभिषेक जावीरने सांगितला 'फुला'चा थरार!

Beed News: परफेक्ट च्या शोधात अनेक जण रिजेक्ट; तरुणींच्या अटींमुळे तरुणांचे वय चालले वाढत; शेतकरी मुलांना नकारच

SCROLL FOR NEXT