Jalindar Kamthe statement BJP panel in Haveli Bazar Samiti elections pune sakal
पुणे

Pune News : हवेली बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचा पॅनेल; जालिंदर कामठे

पक्षाचे नेते जालिंदर कामठे यांची घोषणा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यातील महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक ही उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे तब्बल २२ वर्षाच्या खंडानंतर यंदा होत आहे.

या बाजार समितीवर आतापर्यंत कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता असायची. मात्या बाजार समितीच्या यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (भाजप) हा पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. या निवडणुकीत भाजपचा स्वतंत्र पॅनेल उभा केला जाणार आहे.

यासाठी येत्या आठवडाभरात जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित कऱण्यात आली आहे, अशी माहिती भाजपचे पश्‍चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी मंगळवारी (ता.१७) पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवरही (पीडीसीसी) भाजपचा एकही संचालक कार्यरत नव्हता. परंतु गतवर्षी झालेल्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन दिग्गज संचालकांचा पराभव केला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हेच पराभूत दिग्गज आणि भाजपचे हेच विजयी संचालक हे हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीशी निगडित असतील. त्यामुळे जिल्हा बॅंकेप्रमाणेच या निवडणुकीतही भाजप स्वतंत्र पॅनेल उभा करेल आणि बहुमताने भाजप ही बाजार समिती ताब्यात घेईल, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कामठे म्हणाले, ‘‘या कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या बावीस वर्षांपासून प्रशासकराज आहे. मात्र उच्च न्यायालयाने या बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक घेण्याचा नुकताच आदेश दिला आहे. या आदेशानुसार या बाजार समितीची निवडणूक घेण्यात येत आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Transport: महाराष्ट्रात बेकायदेशीर वाहतुकीवर सर्जिकल स्ट्राईक! राज्यव्यापी धडक मोहीम सुरू; अंमलबजावणी कधीपासून?

Protein Benefits: फक्त बॉडीसाठी नव्हे, तर दैनंदिन आरोग्य टिकवण्यासाठीही प्रोटीन अत्यंत गरजेचं! जाणून घ्या कारणे

Horscope : उद्यापासून धनदौलत योग! 'या' 5 राशींचा सुवर्णकाळ सुरू; नोकरी-व्यवसायात मोठी संधी, अडकलेल्या कामात मिळेल नशिबाची साथ

फी न भरल्याने आठवीतील विद्यार्थ्याला परीक्षेस मज्जाव, शाळेच्या कारवाईविरोधात कडक पाऊल उचलण्याचा इशारा, पनवेलमध्ये नेमकं काय घडलं?

Khutbav News : शेतकरी महिलेने शेतीकाम करत मराठी साहित्य क्षेत्रामध्ये वाजवला गौरवाचा डंका

SCROLL FOR NEXT