पुणे

अजितदादांना सायकलवरून शाळेत सोडणाऱ्या जालिंदर काकांचं निधन

मिलिंद संगई

बारामती : ....कायमस्वरुपी पवार कुटुंबियांप्रती असलेली निष्ठा जपलेल्या काटेवाडी (ता. बारामती) येथील जालिंदर शेंडगे यांनी बुधवारी (ता. 07) अंतिम श्वास घेतला. 

पवार कुटुंबियांतील अनेकांची सेवा केलेल्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कधी काळी सायकलवरुन शाळेपर्यंत पोहचविलेल्या जालिंदर यांच्या आजारपणात स्वत: अजित पवार यांनी लक्ष घातले होते. त्याच्यावर सर्वोत्तम उपचार व्हावेत म्हणून पवार यांनी आपले स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. 

मात्र अखेर नियतीला हे मान्य नव्हते. जालिंदर यांचा नुकताच मृत्यू झाला. जालिंदर हे पडेल ते काम करत असत. स्वत: अजित पवार यांना त्यांच्या लहानपणी सायकलवरुन शाळेत सोडण्यापासून ते दूध काढणे, गोठा स्वच्छ करण्यापासून ते शेतीचीही कामे त्यांनी अनेक वर्षे इमाने इतबारे केली.

फेब्रुवारी महिन्यात जालिंदर यांची प्रकृती नाजूक बनली होती. ही बाब सुनीलकुमार मुसळे यांना समजल्यावर त्यांनी अजित पवार यांना याची माहिती दिली. त्या नंतर पवार यांनी स्वत: त्यांच्यावर उपचार व्हावेत या साठी डॉक्टरांशी चर्चा केली. उपचारात कसलीही कमतरता भासू नये याची तजवीज पवार यांनी केली. लहानपणी ज्याच्या अंगाखांद्यावर खेळलो, लहानाचे मोठे झालो, त्या जालिंदर यांच्या प्रती अजित पवार यांची असलेली आपुलकी आणि जिव्हाळा या निमित्ताने समोर आला. एरवी स्वभावाने कडक असलेले अजितदादा जेव्हा कुणावर अशी वेळ येते तेव्हा किती हळवे होतात हेच या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखीत झाले.

(संपादन : सागर डी. शेलार) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत मोठा अनर्थ टळला! मोटरमनच्या क्षणभराच्या चुकेने प्रवाशांचा थरकाप, भांडूप स्थानक आलं तरी लोकल थांबली नाही, काय घडलं?

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणात मोठी उलथापालथ, भाजप अध्यक्षपदाच्या दिशेने

पुण्याची बातच न्यारी! मृणाल ठाकूरने पुण्यात येताच केली 'ही' गोष्ट, खास मराठी पोस्ट करत म्हणाली... 'पुण्यात आलो आणि...'

Indore Fire Accident : इमारतीला भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू; इलेक्ट्रिक कार चार्जिंग करताना शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना

SCROLL FOR NEXT