पुणे

6 कोटी 5 लाख दंडा पैकी 2 कोटी 9 लाख वसूल

CD

सहा कोटी ५ लाख दंडापैकी २ कोटी ९ लाख वसूल

जालना जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरण
२७१ प्रकरणांत कारवाई; ९९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

ॲग्रोवन वृत्तसेवा

जालना : जिल्ह्यात गौण खनिजांचे अवैध उत्खनन, वाहतूक आणि साठवणुकीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या कारवाईत आतापर्यंत २७१ अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. संबंधितांना ६ कोटी ५ लाख ७ हजार रुपये दंड आकारण्यात आला असून, त्यापैकी २ कोटी ९ लाख ५४ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तसेच ९९ व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तालुकानिहाय कारवाईत अंबड तालुका आघाडीवर असून, येथे ६८ प्रकरणांत कारवाई करून २ कोटी २८ लाख ६१ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. त्यापैकी ५७.३२ लाख रुपयांची वसुली झाली असून, २३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जाफ्राबादमध्ये ४९ प्रकरणे नोंदवून १ कोटी २९ लाख ६४ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, २६.५३ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. या तालुक्यात २८ गुन्हे दाखल झाले आहेत.

जालना तालुक्यात ३४ प्रकरणांत ६७.२९ लाख रुपयांचा दंड आकारून २५.३२ लाख रुपयांची वसुली करण्यात आली असून, चार गुन्हे दाखल झाले आहेत. बदनापूरमध्ये १५ प्रकरणांत २६.५५ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, १.१५ लाख रुपयांची वसुली झाली आहे. येथे ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

घनसावंगीमध्ये १७ प्रकरणांत २९.९९ लाख रुपयांचा दंड आकारून २४.४३ लाख रुपयांची वसुली झाली असून, १४ गुन्हे दाखल आहेत. परतूरमध्ये ३० प्रकरणांत २५.८४ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, १८.४९ लाख रुपयांची वसुली झाली आहे. येथे चार गुन्हे दाखल आहेत.

मंठा तालुक्यात ३४ प्रकरणांत ४४.१७ लाख रुपयांचा दंड आकारून ३५.११ लाख रुपयांची वसुली करण्यात आली असून, तीन गुन्हे दाखल झाले आहेत. भोकरदनमध्ये २४ प्रकरणांत ५२.९८ लाख रुपयांचा दंड आकारून २१.१९ लाख रुपयांची वसुली झाली असून, १२ गुन्हे दाखल आहेत.

कारवाईदरम्यान १० वाळू, चार वाहने तसेच इतर गौण खनिजांशी संबंधित साहित्य जप्त करण्यात आले आहे. शासनास देय असलेली रॉयल्टी, दंड व इतर शुल्कांची वसुली करण्याबरोबरच प्रकरणाच्या स्वरूपानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल, पोलिस आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात गौण खनिजांचे अवैध उत्खनन व वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. अवैध उत्खनन अथवा वाहतूक आढळल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नागरिकांनी आपल्या परिसरात गौण खनिजांचे अवैध उत्खनन, वाहतूक अथवा साठवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित तहसीलदार अथवा महसूल प्रशासनास माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli MIDC protest : सैनिक टाकळी एमआयडीसीविरोधात शिरोळमध्ये राडा; प्रशासनाच्या कार्यालयाचे गेट तोडले, काचा फोडल्या, पोलिस कर्मचारी जखमी

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Duleep Trophy 2026: हा, मुलगा कमाल आहे! वैभव सूर्यवंशीच्या सांगण्यावरून DRS घेतला अन् सामन्यात ट्विस्ट आला Video Viral

मुलांना शाळेत जायला चीनने बांधली ९०० फूट उंच लिफ्ट, आता पर्यटकांची होते गर्दी; विद्यार्थ्यांचा ३ तासांचा प्रवास काही मिनिटात

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

SCROLL FOR NEXT