पुणे

पवना नदीला ‘हिरवा फास’

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पवना नदीला पुन्हा जलपर्णीने विळखा घातल्याने अस्वच्छता निर्माण झाली आहे. केजुदेवी बंधारा व चिंचवड विसर्जन घाट या भागातील नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. मात्र, याकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. 

केजुदेवी बंधाऱ्यालगत दोन किलोमीटरपर्यंतचे नदीपात्र हे जलपर्णीने व्यापले आहे. त्यात तेथील घाटाच्या परिसरात जलपर्णी बाजूला करून अस्वच्छ पाण्यात कपड्याची धुलाई केली जात आहे. आधीच जलपर्णीमुळे पाणी अस्वच्छ असून, त्याचा अंघोळ आणि कपडे स्वच्छ करण्यासाठी वापर केला जात आहे. याशिवाय वाढणाऱ्या जलपर्णीमुळे नदीतील जलचरांना प्राणवायू मिळणे कठीण झाले आहे. गेल्यावर्षी केजुदेवी बंधाऱ्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात मासे मृत झाली होती. त्यामुळे जलपर्णी वेळेत न काढल्यास यंदाही तसा प्रकार होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

सांडपाण्यामुळेच वाढ
पवना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले जाते. त्यामुळे जलपर्णी वाढत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने थेरगाव, केजुदेवी बंधारा परिसरातील नदीपात्राचा सर्व्हे केला होता. त्या वेळी वाकड, थेरगाव भागातील सोसायट्यांमधील सांडपाणी थेट नदीत जात असल्याचे आढळून आले होते. सांडपाण्यामुळे जलपर्णीची वाढ होत असल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही सांडपाणी थांबविण्यासाठी महापालिकेकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याने जलपर्णी वाढू लागली आहे. 

परिणामी, पवना नदीच्या पात्रात वाढलेल्या जलपर्णीचा त्रास या भागात राहणाऱ्या नागरिकांना होतो. अनेक नागरिक यासंदर्भात महापालिकेकडे तक्रार करतात. मात्र, महापालिकेकडून त्याची दखल घेतली जात नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्‍त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT