पुणे

जांभूळवाडी- शिवाजीनगर बस सुरू करण्याची मागणी

CD

आंबेगाव, ता. १७ : आंबेगाव खुर्द परिसरातील वाढते नागरीकरण आणि प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, कोरोना काळात बंद झालेली जांभूळवाडी ते शिवाजीनगर ही पीएमपी बससेवा तातडीने पूर्ववत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सध्या या मार्गावर जांभूळवाडी ते स्वारगेट (बस क्र. २९०) ही एकमेव सेवा सुरू आहे. मात्र, लिपाणे वस्ती, विठ्ठलनगर, सिद्धिविनायक सोसायटी आणि जांभूळवाडी परिसरातील वाढत्या लोकसंख्येमुळे या बसवर प्रचंड ताण येत आहे. थेट शिवाजीनगर किंवा मंडईला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा दुसरा पर्याय नसल्याने नोकरदार, महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. याबाबत चंद्रकांत गुरव यांनी पीएमपी प्रशासनाला ई-मेलद्वारे निवेदन पाठवले आहे.

IND vs SL, 1st Test, Day-3: श्रीलंकेने फॉलो-ऑन टाळला, पण भारताला मिळाली मोठी आघाडी! सोनल दिनुशा शतक करत चकमकला

BMC: शुद्ध हवेसाठी हायपरलोकल सेन्सर्स, प्रदूषणावर मात करण्यासाठी महापालिकेचा नवा प्लॅन

Marathi News Live Updates : शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी उच्च शिक्षण विभागाचे सचिव, एनटीएचे महासंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली

Ramp AI Index: नामांकित कंपन्यांमध्ये AI चा अतिवापर? ६ महिन्यांत खर्च तिप्पट; एका कर्मचाऱ्यामागे मोजावे लागतात ७ लाख?

Ravindra Jadeja Milestone: रवींद्र जडेजा कपिल देवनंतर 'असा' पराक्रम करणारा दुसराच भारतीय! जगातील चार दिग्गज ऑलराऊंडरमध्ये एन्ट्री

SCROLL FOR NEXT