पुणे

कारवाईचा बडगा फक्त ग्रामसेवकांवरच का?

CD

कवठे येमाई, ता. २२ : जांबूत (ता. शिरूर) ग्रामपंचायतीतील शौचालय अनुदान वितरणातील आर्थिक अनियमिततेप्रकरणी दोन तत्कालीन ग्रामसेवकांच्या पुढील दोन वेतनवाढी कायमस्वरूपी रोखण्यात आल्या आहेत. मात्र, संबंधित बेअरर धनादेशांवर तत्कालीन सरपंचांच्या सह्या असतानाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने चौकशीच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे ‘कारवाईचा बडगा फक्त ग्रामसेवकांवरच का?’ असा सवाल उपस्थित होत आहे.
सीपीग्राम (CPGRAM) पोर्टलवरील तक्रारीनंतर पंचायत समितीमार्फत झालेल्या चौकशीत स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा करण्याऐवजी अनेकांना बेअरर धनादेश वितरित केल्याचे निष्पन्न झाले. आर्थिक नियमांना छेद देणाऱ्या या प्रकाराची दखल घेत तत्कालीन ग्रामसेवक कुंवरलाल घासले आणि आशिष भागवत यांच्या पुढील दोन वेतनवाढी रोखण्याची कारवाई केली. मात्र, तक्रारदार भरत कोरडे यांनी या कारवाईवर नाराजी व्यक्त करत वरिष्ठ प्रशासनाकडे नव्याने निवेदन सादर केले. चौकशी अहवालात त्रुटी नमूद असतानाही तत्कालीन सरपंच, गटविकास अधिकारी आणि अन्य संबंधितांच्या भूमिकेची चौकशी केली नसल्याचा आरोप करत या संपूर्ण तक्रारींची वरिष्ठ स्तरावरून नव्याने स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

शासकीय निधीत अनियमितता व अपहार झाल्यास केवळ विभागीय कारवाई करून प्रकरण संपविणे योग्य नाही. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत, तसेच अपहार झालेली रक्कम व त्यावरील व्याज दोषींकडून वसूल करावा.
- भरत कोरडे, तक्रारदार

जांबूत ग्रामपंचायतीसंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी समिती नेमली होती. समितीच्या अहवालानुसार दोन ग्रामसेवकांवर कारवाई केली आहे. तक्रारदारांना चौकशी समितीचा अहवाल अमान्य असल्याने त्यांनी केलेल्या तक्रारीवर वरिष्ठ स्तरावर निर्णय घेतला जाईल.
- महेश डोके,
गटविकास अधिकारी, शिरूर

जांबूत ग्रामपंचायतीतील शौचालय अनुदान वितरणात अपहार झाल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. गाव हागणदारीमुक्त व्हावे आणि लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम तत्काळ मिळावी, या उद्देशाने ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कार्यकारिणी यांच्याशी चर्चा करून बेअरर धनादेशाद्वारे रक्कम वितरित केली होती. या प्रक्रियेमागे कोणताही वैयक्तिक हेतू नव्हता. वैयक्तिक आकसापोटी माझ्या कार्यकाळातील माहिती मागवून जाणीवपूर्वक तक्रारी करून त्रास दिला जात आहे.
- जयश्री जगताप,
तत्कालीन सरपंच, जांबूत (ता. शिरूर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Mittal IAS Resignation : आयएएस पदाचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Pune Mega Plan : पुण्याचा २०३६ चा मेगा प्लॅन विकास आराखडा तयार : अर्थव्यवस्था २२० अब्ज डॉलर करण्याचे उद्दिष्ट

Solapur Farmer Loan Waiver : 59 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा; त्रुटी दूर, नवीन यादी लवकरच होणार जाहीर, आतापर्यंत 30 हजार 500 शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध

Marathi News Live Updates: ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून आमदाराचा महापालिका आयुक्तांना धमकीचा आरोप; ठेकेदाराच्या पात्रतेवरून नेमका काय घडला वाद?

Election Symbol Controversy : निवडणूक आयोग एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून काम करत असेल तर आता काय उरते?; हायकोर्टाचा सवाल

SCROLL FOR NEXT