पुणे

जुळणी न झालेले व तार्किक विसंगती असलेल्या मतदारांचे प्रलंबित कामकाज तातडीने पूर्ण करावे;

CD

प्रलंबित कामे तातडीने करा ः गाढे
​जामखेड शहर, ता. १५ ः जामखेड तालुक्यातील जुळणी न झालेले ३७८२ व तार्किक विसंगती असलेले ८९६८ असे एकूण १२७५० मतदारांपैकी फक्त २० टक्के म्हणजे २५३७ मतदारासंदर्भातच आतापर्यंत कार्यवाही झाली असल्याने प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिले आहेत.
तहसील कार्यालय, जामखेड येथे आयोजित करण्यात आलेल्या सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. वेळोवेळी सूचना देऊनही काही बीएलओ यांच्या कामात सुधारणा होत नसल्यामुळे कामात हलगर्जीपणा करणाऱ्या बीएलओवर कडक कारवाई करणार असल्याचेदेखील उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
​सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या बैठकीत बुधवार (ता. १४) कामकाजाचा आढावा घेताना काही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी अद्यापपावेतो कामच सुरू न केल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली असून, अशा कर्मचाऱ्यांना तातडीने नोटीस देऊन त्यांचा लेखी खुलासा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी मागविण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले आहेत. यामध्ये विशेषतः जामखेड तालुक्यातील जांबवाडी, जामखेड यादी भाग क्रमांक १०४ व १०५, धामणगाव आणि माहारुळी या केंद्रांवरील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे कामकाज शून्य टक्के असून, वारंवार सूचना देऊनही सदर बीएलओ यांच्या कामात सुधारणा होत नसल्याची माहिती बैठकीत सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी दिली. याबाबत उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि काही बीएलओंना थेट बैठकीतूनच फोन लावून तातडीने काम सुरू करण्याचे कडक आदेश दिले.
​दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यात जुळणी न झालेले व तार्किक विसंगती असलेले एकूण २,९२,४५२ मतदार असून, त्यापैकी ४७,६९२ मतदारांसंदर्भात कार्यवाही पूर्ण झालेली आहे. उर्वरित मतदारांसंदर्भात आवश्यक कागदपत्रे प्राप्त करून घेऊन त्याबाबत उचित कार्यवाही करण्याचे काम जिल्ह्यातील सुमारे ३८२ सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत सुरू असल्याचे सुनील गाढे यांनी सांगितले आहे. त्या अनुषंगानेच जामखेड तालुक्यातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले, तसेच भारत निवडणूक आयोगाने दावे व हरकती दाखल करण्यासाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली असल्याने नवोदित मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्राप्त होणाऱ्या फॉर्मबाबत म्हणजेच नावनोंदणी, वगळणी व दुरुस्ती इत्यादी बाबींवर विहित मुदतीत व विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून निर्णय घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
​या बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांच्यासमवेत प्रभारी तहसीलदार शीतलकुमार सावळे, गटविकास अधिकारी शुभम जाधव, निवडणूक नायब तहसीलदार विशाल सदनापूर, प्रदीप पांडुळे, प्रियांश सरोदे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Strict Action : मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग अन् भेसळीला पूर्ण बंदी! आयुक्त तुकाराम मुंढेंकडून कडक नियमावली जारी; नियम मोडल्यास थेट कारवाई

Medical Courses : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी शुक्रवारपर्यंत मुदतवाढ

Latest Marathi News Update: लैंगिक शोषणप्रकरणी कोऱ्हाळे खुर्द येथील तरुणावर गुन्हा

नाना पाटेकरांनी सिंहगडाच्या पायथ्याशीच फार्महाऊस का बांधलं? पुरुषोत्तम बेर्डेंनी सांगितलं कारण, म्हणालेले- इथून महाराजांचे...

Akola District Drought : दुष्काळाच्या झळा; लोणी गावातील दुग्ध व्यवसाय संकटात! पाणी आणि चाऱ्याअभावी पशुपालक हवालदिल; म्हशी विकण्याची वेळ

SCROLL FOR NEXT