पुणे

‘जमलं बुवा एकदाचं!’ नाटक

CD

विनोदी गोंधळातून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा; ‘जमलं बुवा एकदाचं’ नाट्यकृती मनोरंजन करणारी

६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत तिसऱ्या दिवशी सृजन फाउंडेशन अदाकारी (फलटण) या संस्थेचे व साताऱ्याच्या रंगप्रवाह नाट्यसंस्था यांच्या सहकार्याने, दशरथ राणे लिखित आणि साताऱ्यातील गुणी कलावंत इम्रान मोमीन दिग्दर्शित ‘जमलं बुवा एकदाचं’ हे फर्मास नाटक फार्सिकल कॉमेडी स्वरूपात सादर करण्यात आले.

- शेखर कुलकर्णी, ज्येष्ठ रंगकर्मी.

दशरथ राणे यांनी फार्सिकल कॉमेडीच्या अंगाने उभी केलेली ही नाट्यकृती हलकेफुलके मनोरंजन करणारी आहे. नाटकाचा विषय फार गंभीर नसला, तरी त्यातील प्रसंगरचना, पात्रांचे स्वभाववैशिष्ट्य आणि विनोदी गोंधळ यांमधून प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न आहे. या नाटकाचे यश केवळ विनोदी संवादांवर अवलंबून नसून, कलाकारांची टायमिंग, देहबोली, संवादफेक, प्रसंगांमधील वेग आणि एकमेकांशी साधलेला समन्वय यांवरही अवलंबून आहे. विशेषतः फार्सिकल कॉमेडीमध्ये विनोदाची लय किंचित जरी चुकली, तरी प्रसंगाचा परिणाम कमी होऊ शकतो.
या नाटकात साहेबराव- चंद्रकांत जाधव हे व्यक्तिमत्त्व विशेष लक्षवेधी ठरते. स्वतःला सर्वज्ञ समजणारा, इतरांच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार असल्यासारखा वागणारा माणूस परिस्थितीच्या कचाट्यात सापडतो, तेव्हा त्यातून विनोदाची निर्मिती होते. लक्ष्मीकांत- रमेश जाधव हा साहेबरावांचा जावई आणि धाकट्या- सुधीर जाधव हा साहेबरावांचा नोकर यांची साहेबरावांना वठणीवर आणण्याची धडपड नाटकाला अधिक मनोरंजक बनवते. विशेषकरून धाकट्याची लवचिकता, टायमिंग सेन्स आणि संवादफेक अप्रतिम!
परंतु, या विनोदाच्या पलीकडे नाटक एक महत्त्वाचा सामाजिक विचारही मांडते. लग्न हा दोन व्यक्तींच्या आयुष्याचा निर्णय असतो. त्यात श्रीमंती, प्रतिष्ठा किंवा सामाजिक स्थान यापेक्षा त्या व्यक्तींच्या आवडीनिवडी आणि मनाला अधिक महत्त्व असले पाहिजे. सायलीच्या- सोनाली कदम यांनी उभ्या केलेल्या बिनधास्त व्यक्तिरेखेतून हा विचार अधोरेखित होतो.
अखेर सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो. साहेबरावांना परिस्थितीचे वास्तव समजते आणि ते सायलीचे लग्न तिच्या पसंतीच्या मुलाशी म्हणजेच रिक्षावाला सौरभ- विनोद पवार याच्याशी लावून देण्यास तयार होतात. प्रेमाला मान्यता मिळते, गैरसमज दूर होतात आणि सगळ्या नाट्यमय गोंधळावर पडदा पडतो.
नाटकाला अधूनमधून विनोदाचा तडका देण्यासाठी सेल्समन- विनोद तांबवेकर आणि वार्डबॉय या पात्रांची रचना छान केली आहे आणि मग प्रेक्षकांच्याही चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आणत नाटकाचा शेवट होतो... ‘जमलं बुवा एकदाचं!’
या नाटकाचे संगीत- ओंकार जांभळे आणि हृषीकेश अडागळे यांनी फार्सिकल कॉमेडीला साजेसे दिले आहे. मध्ये मध्ये गाजलेल्या गाण्यांचा वापर अप्रतिम! रोहित ढेबे याची प्रकाशयोजना, प्रथमेश आणि अनिकेत यांचे नेपथ्य पूरक. रमेश जाधव- मनाली कदम यांची रंगभूषा आणि मनीष काशीद- सोनाली कदम यांची वेशभूषा ठीक! भरत पवार, श्रेया फडतरे, भरत जाधव आणि सहकार्याची रंगमंच व्यवस्था उत्तम.
विशेष म्हणजे दोन वेळेस लाइट जाऊन देखील सर्व नवख्या हौशी कलाकारांनी नाटकाचा तोल कुठेही ढळू दिला नाही. त्याबद्दल सर्व कलाकारांचे कौतुक. एकंदरीत, दोन घटका मनमुराद हसवणारे, कौटुंबिक मनोरंजन करणारे आणि शेवटी प्रेमाचा विजय अधोरेखित करणारे नाटक म्हणून ‘जमलं बुवा एकदाचं!’ या नाटकाकडे पाहता येईल.
शेवटी विशेष कौतुक या नाटकाचे दिग्दर्शक इम्रान मोमीन यांचे करावे लागेल. कारण दरवर्षी ते नवख्या आणि ग्रामीण भागातील कलाकारांना घेऊन उत्तम नाटक सादर करतात.
------------------------
कालच्या पानातील लोगो वापरणे

66759
सातारा ः ‘जमलं बुवा एकदाचं’ नाटकात सादरीकरण करताना सृजन फाउंडेशनचे कलाकार.
-------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PF Rule Change: पीएफचे नियम बदलले! आता 90% रक्कम काढता येणार, फक्त 2 महिन्यांची अट; नोकरदारांना मोठा दिलासा!

SA vs BAN 1st Test : १२ धावांचे लक्ष्य अन् दक्षिण आफ्रिकेचा ९ चेंडूंत विजय! WTC Final च्या शर्यतीत मोठी उलथापालथ, भारताच्या स्वप्नांना धक्का; समजून घ्या गणित

आधी चाकूहल्ला, आता पुन्हा जीवे मारण्याची धमकी! सैफ अली खानला धमकी देणारी व्यक्ती कोण?

PUC Certificate Validity: तुमच्या गाडीचा PUC किती दिवस वैध राहणार? मुदत संपल्यास काय होणार? केंद्र सरकारचे नवे नियम जाणून घ्या!

Marathi News Live Updates : तामिळनाडू विधानसभेचे आमदार व्ही. एस. बाबू यांचे निधन

SCROLL FOR NEXT