अजित पवार sakal
पुणे

यात्रांमुळे बाधितांची संख्या वाढणार, अजित पवारांची केंद्रावर टीका

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सण-उत्सवांचा काळ येत असल्यामुळे काळजी घ्या, असे एकीकडे सांगणाऱ्या केंद्र सरकार, दुसरीकडे नवीन चार मंत्र्यांना मात्र यात्रा काढा असे सांगते. या यात्रा कुठे कुठे झाल्या, कशा पद्धतीने हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांचा फटका निश्‍चित बसणार असून त्यातून कोरोना बधितांची संख्या वाढणार आहे. त्याला जबाबदार कोण, असा उलट सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारला रविवार केला.

कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे केंद्र सरकारने केरळ आणि महाराष्ट्राला सजग राहण्याचा इशारा दिला आहे. त्या संदर्भात रविवारी पुण्यात कार्यक्रमासाठी आलेल्या पवार यांना विचारले असता, त्यांनी केंद्र सरकारच्या दुटप्पी धोरणावर टीका कली.

ते म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने सूचना केली आहे, हे बरोबर आहे. कारण केरळमध्ये एक महत्त्वाचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. त्याचा फटका बसला. देशपातळीवर आज सर्वांत जास्त बाधितांची संख्या केरळमध्ये आहे. ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या संदर्भात मी अधिकाऱ्यांची चर्चा केली. आपल्याकडे देखील संख्या वाढत आहे. येत्या काही दिवसांत दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र आणि त्यानंतर दिवाळी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. या काळात गर्दी होते. मास्कचा वापर होत नाही. गर्दी वाढल्याने पहिल्या आणि दुसऱ्या लोटेत बाधितांची संख्या वाढली. तिसऱ्या लाटेत ही हे होऊ शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे केरळ आहे. त्यामुळे काळजी घेण्यासंदर्भात केंद्र सरकारने आवाहन केले. आपण ही काळजी घेतली पाहिजे, या मताचा मी आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT