Jan Samman Rally esakal
पुणे

Jan Samman Rally : बारामतीत रविवारी महायुतीची जन सन्मान रॅली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक महत्वपूर्ण बैठक आज (ता. 8) मुंबईत पार पडली.

मिलिंद संगई बारामती

बारामती : महायुतीच्या वतीने नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातील भरीव तरतुदी जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीकोनातून महायुतीच्या वतीने बारामतीत येत्या रविवारी (ता.14) जन सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून ही रॅली बारामतीत आयोजित करण्यात येत असून या निमित्ताने बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुती आपले शक्ती प्रदर्शन करणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक महत्वपूर्ण बैठक आज (ता. 8) मुंबईत पार पडली. या बैठकीत, येत्या 14 जुलै रोजी बारामतीत जाहीर “जन सन्मान” रॅली आयोजित करण्याचा ठराव करण्यात आला आहे. बारामतीची होणारी ही ऐतिहासिक रॅली पक्षाच्या कार्यकर्त्यांना, भविष्यातील वाटचालीच्या दृष्टीने महत्वाचा संदेश देणारी असेल. तसेच, काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील योजनांचा लाभ आणि बळ जनतेला मिळवून देण्यासाठी पक्ष म्हणून कराव्या लागणाऱ्या कामांची देखील रूपरेखा या जाहीर सभेत सादर केली जाईल.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील या रॅलीसाठी निमंत्रित करण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न असून त्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची अजित पवार यांनी रविवारी विमानतळावर एक बैठक देखील घेतली. त्यानुसार बारामतीत अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी आता या रॅलीचे आयोजनासाठी बैठकांचे सत्र सुरू केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT