पुणे

‘जनाई-शिरसाई’ लाभक्षेत्रात पाणीटंचाईचे सावट

CD

उंडवडी, ता. १६ : जलसंपदा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जनाई व शिरसाई उपसा सिंचन योजनांच्या लाभक्षेत्रातील अनेक गावे तहानलेली आहेत. मंजूर कोट्यापेक्षा कमी पाणी उपलब्ध झाल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
यंदाच्या उन्हाळी आवर्तनात ‘जनाई’साठी ३०० व ‘शिरसाई’साठी २०० दशलक्ष घनफूट पाणी मंजूर होते. मात्र, प्रत्यक्षात अनुक्रमे १९० व १७० दशलक्ष घनफूटच पाणी मिळाल्याचा दावा शेतकरी करीत आहेत. खडकवासला पाटबंधारे विभागाने अधिक पाणी सोडल्याचे म्हटले असले, तरी गळती, बाष्पीभवन आणि अनधिकृत उपशामुळे शेवटच्या गावांपर्यंत पाणी पोहोचलेच नाही. याचा फटका जनाई योजनेतील बारामती तालुक्यातील नारोळी, दंडवाडी, काळखैरेवाडी, राजबाग खैरेपडळ, आंबी खुर्द, बोरकरवाडी, कुतवळवाडी, चांदगुडेवाडी, पानसरेवाडी, दौंड तालुक्यातील जिरेगाव, वासुंदे, रोटी तसेच पुरंदर तालुक्यातील राजुरी, रिसे, खोर आदी गावांना बसला आहे. तसेच, शिरसाई योजनेतील अंजनगाव, जळगाव सुपे, सोनवडी सुपे व उंडवडी कडेपठार परिसरात गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
याबाबत कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी सांगितले की, ‘‘जनाई-शिरसाई उपसा योजनेसाठी पुन्हा लवकरच पाणी सोडणार आहे.’’ दरम्यान, कालवा सल्लागार समितीचे सदस्य पोपट खैरे यांनी नियोजनातील त्रुटींवर टीका करत मंजूर कोट्यातील पाणी तातडीने उपलब्ध न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT