बारामती, ता. २३ : पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेची बारामती शाखा गुरुवार (ता. २५) सुरू होत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे यांनी दिली.
या पतसंस्थेने ५९९ कोटी २५ लाखांच्या ठेवी, ३६१ कोटी ७७ लाखांची कर्जे आणि एकूण ९६१ कोटी रुपयांचा व्यवसायाचा टप्पा गाठला असून, एक हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाकडे वाटचाल सुरू आहे. संस्थेने ३२७ कोटी रुपयांची गुंतवणूक करताना नक्त एनपीए केवळ १.८७ टक्के राखण्यात यश मिळविले आहे. संस्था कोअर बँकिंग प्रणालीवर आधारित युपीआय, आरटीजीएस, एनईएफटी, फास्टटॅग, क्यूआर कोड, प्रिपेड डेबिट कार्ड तसेच विविध विमा सुविधा सभासदांना उपलब्ध करून देत आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या सभासदांना सलग १५ वर्षे व्याजदरात १ टक्का सवलत देण्यात येत आहे.
दिल्लीस्थित नॅफकॅब संस्थेने जनकल्याण पतसंस्थेचा बँक होण्यासाठी देशपातळीवरील सक्षम पतसंस्थांमध्ये समावेश केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने बारामती, कोथरूड (पुणे), गडहिंग्लज आणि तासगाव या चार नवीन शाखांना मंजुरी दिली असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अभिजित चाफेकर यांनी दिली. बारामती शाखेचा उद्घाटन सोहळा गुरुवारी सकाळी १०.३० वाजता विश्व एम्पायर, भिगवण रोड, बारामती येथे होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.