police sakal
पुणे

जनसेवा बचतगट संघाच्यावतीने पोलिसांना चिक्की वाटप

पोलिस तंदुरुस्त राहण्यासाठी उत्तमनगर पोलिसांना चिक्की वाटप करण्यात आली.

राजेंद्रकृष्ण कापसे : सकाळ वृत्तसेवा

खडकवासला : गणेशोत्सव बंदोबस्त म्हटला की, पोलिस यंत्रणा हा उत्सव निर्विघन पार पडावे म्हणून अहोरात्र काम करीत असते. त्या बंदोबस्तावरील पोलिस तंदुरुस्त राहण्यासाठी उत्तमनगर पोलिसांना चिक्की वाटप करण्यात आली.

उत्तमनगर येथील जनसेवा उत्कर्ष स्वयंसहाय्यता बचत गट संघाच्या वतीने उत्तमनगर पोलिसांना आज शनिवारी चिक्कीचे वाटप करण्यात आले. पोलिस निरीक्षक सुनील जैतापूरकर व अर्जुन बोत्रे यांच्याकडे सुपूर्त केली. यावेळी बचत गट संघाचे अध्यक्ष सुरेश गुजर, उपाध्यक्ष दत्तात्रय वाघ, खजिनदार अंबादास धर्मकांबळे, शांताराम गाढवे, सचिन घुमे, दिनेश ऊन्नी, अंकुश तिडके आणि राजश्री धर्मकांबळे, संगीत कुंभार हे संचालक मंडळ उपस्थित होते.

गणेशोत्सवात पोलिसांना जास्त वेळ बंदोबस्त करावा लागतो. तसेच विसर्जन मिरवणुकीला देखील जास्त बंदोबस्त होतो. त्यामुळे, त्यांच्या आरोग्याची हेळसांड होते. बंदोबस्त करण्यासाठी आरोग्य चांगले रहावे म्हणून योग्य आहाराबरोबर चिक्की झाल्यास बंदोबस्ताचा ताण कमी होण्यास मदत होते. म्हणून हा उपक्रम "सकाळ माध्यम समूहाने" सुरू केला होता. तो आम्ही या पुढे सुरू ठेवला आहे. असे बचतगट संघाचे अध्यक्ष सुरेश गुजर यांनी यावेळी सांगितले.

जनसेवा उत्कर्ष स्वयंसहाय्यता बचत गट संघाच्या अध्यक्ष सुरेश गुजर यांनी आज शनिवारी गणेशोत्सव बंदोबस्त निमित्त पोलिस निरीक्षक सुनील जैतापूरकर व अर्जुन बोत्रे यांच्याकडे चिक्की सुपूर्त केली.

जनसेवा उत्कर्ष स्वयंसहाय्यता बचत गट संघाच्या वतीने मागील पाच वर्षांपासून गणेशोत्सवा दरम्यान पोलीस बांधवांकडून बंदोबस्त असतो. त्यांच्या कडून योग्य बंदोबस्त होण्यासाठी त्यांच्या शरीराला आवश्यक अशी चिक्की असते. पोलिस वर्गाला फुल न फुलाची पाकळी म्हणून कृतज्ञता स्वरूपात लोणावळा येथील सुप्रसिद्ध ड्रायफ्रूट चिक्की उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या सर्व अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला दिली.

-सुरेश गुजर, अध्यक्ष जनसेवा बचत गट

पोलीस आणि समाज यांच्यांत योग्य समनव्य असतो. बंदोबस्त आणि नेहमी होत असलेली पोलिसांची धावपळ होत असते. ही बाब जनसेवा बचतगटाने ओळखली. यातून त्यांनी पोलिसाच्या बाबतीत अशा प्रकारे कृतज्ञता आदर व्यक्त केला आहे. त्याचा हा उपक्रम मागील पाच वर्षांपासून सुरू आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.

- सुनील जैतापूरकर, पोलिस निरीक्षक उत्तमनगर पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT