पुणे

Video : पिंपरी-चिंचवडकरांनो असं वागणं बरं नव्हं, जनता कर्फ्यूतही नागरिक पडले घराबाहेर

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शहरात दिवसागणिक कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. दक्षता घेण्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शनिवारी (ता. 4) रात्री उशिरा आठवड्यातून दोन दिवस रविवार व गुरुवारी स्वयंस्फूर्तीने 'जनता कर्फ्यू' पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले. मात्र, शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांना या कर्फ्युचे कुठलेही पत्रक किंवा सूचना मिळाली नसल्याने अक्षरश: या कर्फ्यूचा फज्जा उडाल्याचे चित्र आज (ता. 5) शहरात पाहायला मिळाले. 

कोरोनाचा विळखा घट्ट होत असल्याने गेल्या आठवड्यापासून दिवसाला 200 ते 300 बाधित रुग्ण आढळत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर शहरात कडक लॉकडाउनची मागणी जोर धरू लागली आहे. अखेर शनिवारी रात्री उशिरा आयुक्तांनी व्हॉटसऍप मॅसेजद्वारे रविवारी आणि गुरुवारी शहरवासीयांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले. परंतु, महापालिका प्रशासनाकडून अधिकृत आदेश दिलेला नसल्याने शहरात बंद असणार, की नाही याबाबत शहरवासीयांना संभ्रम होता. परिणामी आयुक्तांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवीत रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी अधिक होती. पावसातही खरेदीसाठी बाहेर पडले. पिंपरी शगुन चौकातील सगळीच दुकाने सुरू होती. प्रामुख्याने कपडे, किराणामाल, भाजीच्या दुकानांची संख्या अधिक होती. मात्र, जनता कर्फ्यू सगळ्यांना लागू करण्याची मागणी झुलेलाल मेन्स बाजारचे सचिव नीरज चावला यांनी केली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नवी सांगवी : नवी सांगवी, पिंपळे गुरव व पिंपळे सौदागरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच ढगाळ हवा व अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरीतही लोक घराबाहेर पडले होते. बहुतांश दुकाने बंद असली तरी काही ठिकाणी दरवाजे अर्धवट उघडून व्यवसाय सुरू होता. गुरुपौर्णिमा असल्याने नागरिकांनी हारफुले व पूजा साहित्य घेण्यासाठी गर्दी केली होती. क्रांती चौक, काटेपुरम चौकातील या दुकानांत गर्दी झाल्याने शारीरिक अंतर न राखल्याचे चित्र सर्रास पाहायला मिळाले. साईचौक, कृष्णा चौक, पिंपळे गुरव, नेताजीनगर, पिंपळे सौदागर येथील दत्तमंदिरात भाविकांची वर्दळ होती. परिसरातील मेडिकल, दुधडेअरी, भाजीवाले व पथारीवाल्यांनी आपली दुकाने थाटल्याने कर्फ्युला हरताळ फासला. 

जुनी सांगवीकरांचा प्रतिसाद, तर दापोडीत संमिश्र बंद
 
जुनी सांगवी : जुनी सांगवीकरांनी बंदला संमिश्र प्रतिसाद दिला. अत्यावश्‍यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ व्यापाऱ्यांनी बंद ठेवली. सकाळपासूनच सांगवी व परिसरात हलक्‍या सरी बरसत होत्या. यात रस्त्यावर क्वचित नागरिक दिसत होते. दापोडी रस्त्यावरून काही ठिकाणी भाजीविक्री सुरू होती, तर चिकन मटणाच्या दुकानांमधून मटण खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ दिसत होती. हीच परिस्थिती जुनी सांगवी परिसरात रविवार असल्याने पाहायला मिळाली. 

भोसरी, इंद्रायणीनगर, दिघीमध्ये फज्जा 

भोसरी : भोसरी, दिघी, इंद्रायणीनगर परिसरातील नागरिकांनी हरताळ फासल्याचे दिसून आले. त्यामुळे या परिसरातील सर्वच व्यवहार सुरळीत सुरू होते. पोलिसांद्वारे भोसरी परिसरात ध्वनिक्षेपकाच्या साहाय्याने याची माहिती रात्री उशिरा देण्यात येत होती. मात्र जनता कर्फ्यूचा निर्णय रात्री उशिरा झाल्याने नागरिकांमध्ये या विषयी जनजागृती झाली नाही. पीएमटी चौक, दिघी रस्ता, आळंदी रस्ता, पुणे-नाशिक महामार्गाचा सेवा रस्ता, इंद्रायणीनगरातील मिनी मार्केट चौक, दिघीतील ममता चौक रस्त्यावर दुकाने थाटली होती. सामाजिक कार्यकर्ते सचिन गोडांबे म्हणाले, की महापालिकेने दररोजची बाजारामध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी दुकाने सुरू करण्यासाठी सम-विषम तारखांचे नियोजन करणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: बिश्नोईने दूर केला तुफानी खेळ करणाऱ्या सुनील नारायणचा अडथळा, कोलकाताने गमावली दुसरी विकेट

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT