पुणे

रांका, दास आणि शिंदे पोलिसांच्या ताब्यात

CD

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली, ता.१३ ः केंद्र सरकारने आंदोलनासाठी बंदी घातलेल्या जंतरमंतरच्या परिसरात हातात तिरंगा घेऊन  बंद असलेले लोखंडी प्रवेशद्वार ओलांडून  घोषणा देत निदर्शने करीत निषेध नोंदविल्याबद्दल आज सकाळी दिल्ली पोलिसांनी  कॉक्रोच जनता पक्षाचे (सीजेपी) मुख्य प्रवक्ते सौरभ दास, राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका आणि राष्ट्रीय संघटन प्रभारी अजिंक्य शिंदे यांच्यासह दहा आंदोलकांना ताब्यात घेतले.  ‘‘आंदोलन आणि विरोधाचा हक्क कधीच रद्द केला जाऊ शकत नाही,’’  असा रोष व्यक्त करीत  सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी या घटनेचा निषेध नोंदविला आहे. 
केंद्र सरकारने एका आदेशाद्वारे  आंदोलन आणि सभांसाठी जंतरमंतरवर बंदी घालण्यात आल्याची घोषणा केल्याच्या दुसऱ्या सकाळी ‘सीजेपी’च्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी त्याचे उल्लंघन केले. ‘‘१३ ऑक्टोबरच्या सकाळी सीजेपीचे सदस्य तिरंगा घेऊन जंतरमंतरजवळ बंदी घातलेल्या भागात जात होते, पण पोलिसांनी त्यांना अटक केली,’’ असे ‘एक्स’वरील पोस्टमध्ये दीपके यांनी म्हटले आहे.  दीपके यांनी या पोस्टमध्ये घटनास्थळावरील चित्रिकरणाचा व्हिडिओही दिला आहे. ज्यामध्ये आशुतोष रांका आणि सौरभ दाससह  ‘सीजेपी’ कार्यकर्ते जंतरमंतरवर पोहोचण्यासाठी लोखंडी गेट आणि पोलिसांचे बॅरिकेड्स ओलांडताना  आणि त्यानंतर दिल्ली पोलिस या सर्वांना पकडून नेताना दिसत आहेत. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये किरकोळ झटापटही झाली. त्यानंतर आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. 


गृह मंत्रालयाच्या समितीच्या शिफारशींनुसार राजधानी दिल्लीत निदर्शने, आंदोलन आणि उपोषणासाठी रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि पूर्व दिल्लीतील सीबीडी मैदान निर्धारित केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ''इंडिया'' आघाडी आणि सीजेपी मध्य दिल्लीत करीत असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय आला आहे. दिल्ली पोलिसांनी १० ऑक्टोबरपासून जंतर-मंतरभोवती कडक बंदोबस्त ठेवला आहे आणि आंदोलकांना या भागात येण्यास बंदी घातली आहे.

कोट

जंतरमंतरवर आंदोलनाला जागा न मिळाल्यास आंदोलने थांबतील,असे पंतप्रधान मोदी यांना वाटते. पण तसे होणार नाही.  आता देशभरात ठिकठिकाणी ‘जंतरमंतर’ निर्माण होईल.
अभिजित दीपके
संस्थापक, सीजेपी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

यवतमाळमध्ये एसटी बस अन् दुचाकीचा भीषण अपघात, दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू

Water Supply : टंचाईग्रस्त गावांत पाण्याची गुणवत्ता तपासणार; १८ हजार ६५० नागरिकांना पिण्यासाठी टँकरद्वारे पाणी

Aadhaar Server Down : आधार सर्व्हर ठप्प, नवीन परिपत्रकाचा पेच; दुय्यम निबंधक कार्यालयांत दस्त नोंदणीचा खोळंबा!

राजेंद्र शिंदे उर्फ राजा खंडणीविरोधी पथकाच्या रडारवर?

NEET Paper Leak: 'प्रश्नपत्रिका हव्यातच कशाला?' पेपरफुटी रोखण्यासाठी नंदन निलेकणींनी काय सुचवला जालीम उपाय?

SCROLL FOR NEXT