Japanese Ambassador Vada Pav eSakal
पुणे

Vada Pav : जपानच्या राजदूतांनी पुण्यात घेतला वडापावचा आस्वाद, पत्नीही झाली खुश! पंतप्रधान मोदी म्हणाले...

वडापाव खातानाचा आपला व्हिडिओ हिरोशी यांनी ट्विटरवर शेअर केला होता.

Sudesh

जपानचे भारतातील राजदूत हिरोशी सुझुकी यांनी काही दिवसांपूर्वीच पुण्यात वडापावचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांच्या पत्नीदेखील त्यांच्या सोबत होत्या. वडापाव खातानाचा आपला व्हिडिओ हिरोशी यांनी ट्विटरवर शेअर केला होता. रविवारी पंतप्रधान मोदींनीही हा व्हिडिओ पाहून यावर प्रतिक्रिया दिली.

थोडा तीखा कम प्लीज..

हिरोशी हे एका कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी वडापाव आणि मिसळ या गोष्टींवर ताव मारला. आपल्याला भारतीय स्ट्रीट फूड अतिशय आवडल्याचं ते म्हणाले. मात्र, त्यांनी यावेळी एक तक्रारही केली. ती म्हणजे, या गोष्टी त्यांच्यासाठी खूपच तिखट होत्या. त्यांनी आपल्या ट्विटमध्येही 'थोडा तीखा कम प्लीज' असं लिहिलं आहे.

जपानचे राजदूत हिरोशी यांनी पुण्यातील या अनुभवाचे आणखी व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केले आहेत. यातील एका व्हिडिओमध्ये हिरोशी आणि त्यांच्या पत्नी वडापाव खाताना दिसतायत. 'माझ्या पत्नीने मला हरवलं' असं कॅप्शन देत हिरोशी यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला पंतप्रधान मोदींनी रिट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मोदी म्हणतात, आणखी येऊदे

"मि. राजदूत, तुम्ही भारतातील पदार्थांचा आस्वाद घेत आहात आणि ते अशा नवीन पद्धतीने सादरही करत आहात हे पाहून आनंद झाला. असे व्हिडिओ येत राहूदेत" अशा आशयाचं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. यासोबतच हिरोशी यांनी उल्लेख केलेल्या स्पर्धेबाबत बोलताना मोदी म्हणाले, की "या स्पर्धेमध्ये हरल्यावर तुम्हाला नक्कीच वाईट वाटणार नाही."

नेटिझन्सचे सल्ले

दरम्यान, हिरोशी यांचे व्हिडिओ ट्विटरवर भरपूर व्हायरल होत आहेत. नेटिझन्स त्यांना विविध पदार्थ ट्राय करण्याचे सजेशन देत आहेत. तिखट वडापावनंतर त्यांना कोणी मँगो लस्सी ट्राय करण्याचा सल्ला देतंय, तर कोणी ताक पिण्याचा सल्ला देताना दिसून येतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT