विधायक - लोगो
---------
जरंडेश्वर मंदिर परिसर श्रमदानातून चकाचक
साताऱ्यातील विठ्ठलकृपा मंडळाचा उपक्रम; प्लॅस्टिक पिशव्यांसह बाटल्या केल्या गोळा
सातारा, ता. १९ ः संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त विधायक उपक्रम राबवत येथील देशमुखनगरमधील विठ्ठल कृपा संस्कृती व क्रीडा मंडळ तसेच विठ्ठलकृपा व मयुरेश्वर कॉलनीतील महिलांसह ४० जणांनी एकत्रित येत श्रीक्षेत्र जरंडेश्वर स्वच्छता मोहीम राबविली. प्लॅस्टिक पिशव्या, बाटल्या गोळा केल्या. त्याचप्रमाणे पक्ष्यांसाठी चारा-पाण्याचीही व्यवस्था केली.
जरंडेश्वर डोंगरावर दररोज तसेच दर शनिवारी भाविक मोठ्या संख्येने हनुमान दर्शन तसेच व्यायामासाठी जातात. अनेक भाविक पर्यावरणाचा विचार न करता सोबत नेलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या डोंगरावरच फेकून देतात. त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते. हा कचरा साफ करण्याचा निर्धार मंडळाच्या सदस्यांनी केला. या मोहिमेमध्ये मंडळातील लहान मुलांपासून ते वयस्कर महिला, पुरुष मोठ्या प्रमाणावर सहभागी होते. सर्व सदस्यांनी पहाटे श्री क्षेत्र जरंडेश्वर हनुमान आरतीनंतर जरंडेश्वर मंदिर परिसरातील स्वच्छता मोहीम सुरू केली. या मोहिमेंतर्गत जरंडेश्वर डोंगरावर सर्वत्र पडलेल्या प्लॅस्टिकच्या शेकडो बाटल्या सदस्यांनी एकत्र गोळा केल्या. त्यांच्या प्रयत्नातून श्री क्षेत्र जरंडेश्वर मंदिर परिसर बाटल्यामुक्त झाला. मंडळातील सदस्यांनी डोंगरावरील पक्ष्यांसाठी पाणी व धान्य झाडावर अडकून ठेवले.
मंडळाचे बाल सदस्य येणाऱ्या प्रत्येक भक्तास पर्यावरण स्वच्छतेबाबत संदेश दिला. मंडळातील सदस्यांच्या वतीने कॉलनी ते जरंडेश्वर मोफत वाहतूक सेवा उपलब्ध केली होती. मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे.
चौकट
-----------
विविध सामाजिक उपक्रमांचा निर्धार
----------
विठ्ठलकृपा कॉलनी व मयुरेश्वर कॉलनीतील सर्व सदस्यांनी जानेवारी महिन्यापासून एकत्र येत मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार कॉलनीतील स्वच्छता, छत्रपती संभाजी महाराज शासकीय मेडिकल कॉलेज रस्त्याच्या दुतर्फा साठलेला कचऱ्याची स्वच्छता, पर्यावरणपूरक कचऱ्याची होळी केली.
W19945
जरंडेश्वर ः येथे स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले विठ्ठलकृपा मंडळाचे सदस्य.
...........................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.