पुणे

जारकरवाडी सोसायटीकडून सभासदांना ११ टक्के लाभांश

CD

पारगाव, ता. २३ : जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील जारकरवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची ६७वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष खंडू भोजने यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात झाली. यावेळी संस्थेकडून सभासदांना ११ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.
संस्थेचे सचिव नवनाथ मंचरे यांनी अहवालाचे वाचन केले. त्यामध्ये अनेक सभासदांनी प्रश्न उपस्थित करवून चर्चेमध्ये भाग घेतला यामध्ये कर्जमाफीच्या विषयावर अधिक चर्चा करण्यात आली. त्यामध्ये जो सभासद दरवर्षी वेळेत आपल्या कर्जाची रक्कम वेळेत भरणा करतोय तोच सभासद आजपर्यंत कर्जमाफीपासून वंचित आहे व जो सभासद प्रत्येक वेळी कर्जमाफीच्या आशेवर आहे अशा सभासदांना मात्र कर्जमाफीचे पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे. या सरकारच्या धोरणामुळे जास्त प्रमाणात नाराजीचा सूर सरकारच्या विरोधात दिसून येत होता. संस्थेच्या सन २०२४/२५ भागभांडवलावर सभासदांच्या मागणीनुसार सभासदांना ११ टक्के लाभांश देण्याचे संस्थेचे अध्यक्ष भोजने यांनी जाहीर केले.
याप्रसंगी भिमाशंकर सहकारी कारखान्याचे संचालक रामचंद्र ढोबळे, शिवाजीराव भोजने, विलास लबडे, माजी उपसरपंच सचिन टाव्हरे, बाळासाहेब लबडे, संतोष कापडी, काशिनाथ ढोबळे, सुभाष भोजने, ताराबाई काकडे, यमुनाबाई कापडी, योगिता लबडे व सभासद उपस्थित होते. सभेला उपस्थित राहिल्याबद्दल संस्थेचे माजी उपाध्यक्ष गणेश खुडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs BAN: बांगलादेशकडून झालेल्या पराभवाचा ऑस्ट्रेलियाने घेतला बदला! मिचेल स्टार्कचा कहर, अवघ्या २ दिवसांत कसोटी जिंकत १-१ ने बरोबरीत

Mumbai News: स्मशानभूमीतील धुरावर नियंत्रण, मुंबईतील 8 ठिकाणी 'इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर' यंत्रणा बसवणार; महापालिकेचा निर्णय

Marathi News Live Updates : 'महिला आरक्षण विधेयकाला राहुल गांधींचाच विरोध- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

IND vs SL: भरमैदानात राडा! जैस्वाल आऊट झाल्यावर श्रीलंकेन गोलंदाजाला भिडला अन् मग...; Video Viral

BMC: 'खिचडी'च्या तव्यावर 'जर्मनी'ची फोडणी! महापौर-विरोधी पक्षनेत्यात वादाचा तडका

SCROLL FOR NEXT