जावळवाडी शाळेचा
मान्यवरांकडून सन्मान
फत्त्यापूरला बालआनंद मेळावा उत्साहात
नागठाणे, ता. १ : फत्त्यापूर (ता. सातारा) केंद्रांतर्गत ११ शाळांतील विद्यार्थ्यांचा बालआनंद मेळावा उत्साहात झाला. स्वाभिमानी महिला सखी मंचच्या अध्यक्षा समता घोरपडे, जिल्हा परिषदेचे सदस्य अजित साळुंखे, पंचायत समिती सदस्य मानसिंग मोरे, गटशिक्षणाधिकारी जयश्री शिंगाडे, विस्तार अधिकारी अनिल माने, केंद्रप्रमुख सुनीता शेडगे तसेच विविध गावचे सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. पृथ्वीराज निकम यांनी स्वागत केले. जयवंत जाधव यांनी प्रास्ताविक केले. रसिका घोरपडे यांनी सूत्रसंचालन केले. नरेश कारंडे यांनी आभार मानले. परसबाग स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम आल्याबद्दल जावळवाडी शाळेचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र शेळके यांनी मेळाव्यास शुभेच्छा दिल्या. यशस्वितेसाठी शिक्षक, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. मेळाव्यात केंद्रप्रमुख सुनीता शेडगे यांच्या संकल्पनेतून ‘कलादालन’ हा उपक्रम झाला. त्यात विद्यार्थ्यांचे लिखित उपक्रम, कागदी फुले, बुके, चित्रे, कागद कामातील विविध वस्तू प्रतिकृती व मातीकामातील विविध वस्तूंचे प्रदर्शन उल्लेखनीय ठरले.
B08224
फत्त्यापूर (ता. सातारा) : मेळाव्यात बाेलताना अजित साळुंखे. त्या वेळी समता घोरपडे, मानसिंग मोरे आदी.
...........................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.