पुणे

जवळगाव व हिंगणी मध्यम प्रकल्पांच्या दुरुस्तीला गती

CD

जवळगाव अन् हिंगणी प्रकल्पांच्या दुरुस्तीला गती
आमदार दिलीप सोपल यांची माहिती; जलसंपदा मंत्र्यांनी घेतली बैठक

सकाळ वृत्तसेवा
बार्शी शहर, ता. ४ : बार्शी तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे जवळगाव व हिंगणी हे दोन मध्यम प्रकल्प दीर्घकाळापासून दुरुस्तीअभावी दुर्लक्षित होते. या पार्श्वभूमीवर संबंधित कामांना गती देण्याबाबत सकारात्मक हालचाली सुरू झाल्याची माहिती आमदार दिलीप सोपल यांनी दिली आहे.

जवळगाव व हिंगणी हे दोन्ही प्रकल्प शेतकऱ्यांसाठी सिंचनाचा मुख्य आधार आहेत. अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याची गरजही यावर अवलंबून आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यापासून मुख्य कालव्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. दोन्ही प्रकल्पांच्या विशेष दुरुस्तीसाठी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्या नियामक मंडळाच्या ११० व्या बैठकीत डिसेंबर २०२३ मध्ये मान्यता देण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र सिंचन सुधार कार्यक्रमान्तर्गत फेज-२ मधील राज्यातील १५५ प्रकल्पांमध्येही जवळगाव व हिंगणी प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे.
या अनुषंगाने आमदार दिलीप सोपल यांनी ६ फेब्रुवारी रोजी राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री, जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ), महाराष्ट्र राज्य, यांना पत्राद्वारे सविस्तर मागणी सादर केली होती. दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यासाठी अंदाजपत्रक तयार करणे, प्रशासकीय मान्यता देणे व निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत शासन स्तरावर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार दिलीप सोपल, आमदार सुभाष देशमुख तसेच आमदार सचिन कल्याण शेट्टी उपस्थित होते. बैठकीत प्रकल्पांची सद्यस्थिती, कालव्यांतील गळती, दुरुस्तीची तातडीची गरज आणि निधीची उपलब्धता यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
आमदार दिलीप सोपल यांनी सांगितले, जवळगाव व हिंगणी मध्यम प्रकल्पांच्या दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. यासाठी अंदाजपत्रक, प्रशासकीय मान्यता व निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यास शासन स्तरावर गती दिली जाणार असून, मंत्री महोदयांनी संबंधित विभागाला व अधिकाऱ्यांना आवश्यक ते आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Recruitment: बेरोजगार तरुणांसाठी मोठा दिलासा! बीएमसीच्या ९ हजार जागांसाठी मेगाभरती, अर्ज प्रक्रिया कधी?

Shivneri Bus Expansion : ‘मुंबई–पुण्याची राणी’ आता महाराष्ट्रभर; व्होल्वो आणि स्लीपर सुविधांसह शिवनेरीचा होणार विस्तार

Kitchen Hacks: सफरचंद-बटाटा कापल्यानंतर लगेच काळे पडतात? फक्त ‘ही’ ट्रिक वापरा अन् पाहा रिझल्ट

Latest Marathi News Live Update : अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या संघर्षामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान - नाना पटोले

Nashik Municipal Corporation : हरित नाशिकसाठी मनपाचा २५ कोटींचा प्लॅन; वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी तिजोरी उघडली!

SCROLL FOR NEXT