भूगाव (ता. मुळशी) - हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक मदत गोळा करताना ग्रामस्थ.
भूगाव (ता. मुळशी) - हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक मदत गोळा करताना ग्रामस्थ. 
पुणे

हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना जिल्ह्यातून आर्थिक मदत

सकाळवृत्तसेवा

पुणे - जम्मू काश्‍मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांच्या कुंटुबीयांसाठी देशभरातून विविध स्वरूपाची मदत केली जात आहे. पुणे जिल्ह्यातूनही या शहीद हुतात्म्यांच्या कुंटुबीयांसाठी मदत केली जात आहे. भूगाव, भोर, कळस येथून आर्थिक मदतीसाठी नागरिक पुढे आले आहेत.

भुकूममधून १ लाखाचा निधी
भुकूम - जम्मू काश्‍मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी भूगाव (ता. मुळशी) येथील ग्रामस्थांनी सुमारे एक लाख रुपयांचा निधी जमा केला आहे.

या दहशतवादी हल्ल्याचा भूगाव येथे निषेध करून हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. या वेळी ग्रामस्थांनी, हुतात्मा जवानांच्या कुटुंबांना धीर देण्याची गरज आहे. जवान जिवाची परवा न करता ते देशाचे संरक्षण करतात. त्यांच्यामुळे देशातील नागरिक सुरक्षित आहे. सरकार योग्य ती काळजी घेईल. देशातील प्रत्येक नागरिकाने केवळ शाब्दिक भावना व्यक्त करून उपयोग नाही. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून प्रत्येकाने त्यांच्या कुटुंबीयांना मदत करायला हवी, अशा भावना व्यक्त केल्या. त्यानुसार ग्रामस्थांनी हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांसाठी निधी उभारण्याचे ठरविले. त्यातून ग्रामस्थांनी सुमारे एक लाख रुपयांचा निधी जमा केला. हा निधी गावातील माजी सैनिक अनिल चोंधे व संतोष आंग्रे यांच्यामार्फत हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांपर्यंत पोचविण्यात येणार आहे. 

दरम्यान, सैनिकाला सीमेवर लढताना, माझा देश माझ्या पाठीशी आहे, असा विश्वास निर्माण होणे गरजेचे आहे. भारतीय सैन्याने आतापर्यंत अनेक पराक्रम गाजविले आहेत. पुलवामा येथे घडलेल्या भ्याड हल्ल्याचा आपले सैनिक समाचार घेतीलच.

हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना कळसला आर्थिक मदत
कळस - पुलवामा येथील हल्ल्यात हुतात्म्यांना कळस (ता. इंदापूर) येथे ग्रामस्थांनी आदरांजली वाहिली. तर या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी सुमारे वीस हजार रक्कम जमा करण्यात झाली. येथील दत्त मंदिरामध्ये सकाळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत या भ्याड हल्ल्याचा ग्रामस्थांनी निषेध केला. 

सरकारने या हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्याची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. या वेळी रमेश खारतोडे, बाबामहाराज खारतोडे, विजय गावडे, सोमनाथ आगलावे, सुनील खारतोडे, अशोक ससाणे, सुरेश खारतोडे, धनंजय खारतोडे, मौलाना कासीम मुलाणी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT