पुणे

पालकमंत्री शिरसाट व आमदार भुमरे यांनी केले जायकवाडीचे जलपूजन !

CD

जायकवाडीचा पाणीसाठा ९३.९७ टक्क्यांवर
--
पालकमंत्री शिरसाट, आमदार भुमरे यांच्या हस्ते जलपूजन
--

ॲग्रोवन वृत्तसेवा

पैठण : जायकवाडी धरणाच्या नाथसागर जलाशयातील पाणीसाठा ९३.९७ टक्क्यांवर पोहोचला असून, धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. शनिवारी (ता. ८) पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते नाथसागरातील पाण्याचे जलपूजन करण्यात आले.

या वेळी गोदामातेला खण, नारळ व पुष्पहार अर्पण करून ओटी भरण्यात आली. उपस्थितांनी गोदामातेचा जयघोष केला.

धरण नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार, नाथसागराची पाणीपातळी ४६३.५७० मीटर आहे. धरणात एकूण दोन हजार ७७८.०६२ दशलक्ष घनमीटर (दलघमी), तर उपयुक्त पाणीसाठा दोन हजार ३९.९५६ दलघमी झाला आहे. गेल्या २४ तासांत धरणात ११ हजार ९२६ क्युसेकने पाण्याची आवक झाली.

धरणातील आवक सुरू असल्याने आठ दरवाजे अर्धा फूट उघडून गोदावरी नदीपात्रात चार हजार ३२८ क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. गेल्या पाच दिवसांपासून जायकवाडी धरणातून गोदावरीत विसर्ग सुरू आहे.

या विसर्गामुळे गोदावरी नदीवरील आपेगाव आणि हिरडपुरी हे दोन्ही बंधारे भरून वाहत आहेत. त्यामुळे नदीकाठच्या शेतीला पाण्याचा लाभ होण्याची अपेक्षा आहे.

जलपूजनावेळी छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर, पैठण नगरपरिषदेच्या अध्यक्षा विद्या भूषण कावसानकर, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी जी. सी. गौडा, महापालिका आयुक्त येडगे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र धोडपकर, कार्यकारी अभियंता गणेश हासे, उपविभागीय अधिकारी श्रद्धा निंबाळकर, नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, उपविभागीय अभियंता सारडा, धरण तांत्रिक सहायक गणेश खराडकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
---
फोटोओळ

पैठण : जायकवाडी धरणातील पाण्याचे जलपूजन करताना पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार विलास भुमरे व अन्य मान्यवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: NSE IPO लिस्टिंगआधीच शेअर बाजार कोसळला! Sensex 634 अंकानी घसरला; कोणते शेअर्स तोट्यात? NSE IPOचं काय झालं?

‘फक्त टी-शर्ट घालून…’ तुकाराम मुंढेंचा सेलिब्रिटींच्या समर्थनावर सवाल, प्रीती झिंटा-मल्लिकाचा उल्लेख करत म्हणाले

Asian Games 2026: "गोल्ड मिस हो गया"; ३.८८ सेकंदाने सुवर्ण हुकले, ढसाढसा रडला सतनाम; रोशिबिना देवीचे सलग तिसरे पदक

Latest Marathi News Live Update : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

India New Zealand Tour : कसोटीच्या तयारीसाठी वनडेतून विश्रांती? ; न्यूझीलंड दौऱ्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे संकेत

SCROLL FOR NEXT