पुणे

सुषमा अंधारे प्रेस

CD

PNE26W41110 - पालकमंत्र्यांवर दाखल गुन्ह्यांची यादी दाखवताना सुषमा अंधारे.
.........
पालकमंत्री गोरे यांच्याविरोधात अंधारेंचे आरोप
विविध प्रकरणांतील कागदपत्रांचा हवाला देत पत्रकार परिषदेत प्रश्न उपस्थित
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ९ : शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत भाजपचे नेते तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात विविध प्रकरणांवरून आरोप केले. संबंधित कागदपत्रांचा हवाला देत त्यांनी काही प्रकरणांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा दावा केला.
अंधारे यांनी कोविड काळातील वाई येथील कोविड सेंटरमधील कथित गैरव्यवहार, २२३ कथित बनावट बिले, मृत व्यक्तीच्या नावाने आधारकार्डाचा कथित वापर, मृत रुग्णांना कागदोपत्री जिवंत दाखवल्याचा आरोप, बनावट स्वाक्षऱ्या व शिक्के तसेच ४ ते ५ कोटी रुपयांच्या कथित निधी व्यवहाराबाबत प्रश्न उपस्थित केले. काही प्रकरणांमध्ये मुख्य आरोपी अथवा संबंधितांची नावे वगळण्यात आली का, तसेच पोलिस तपासाबाबतही त्यांनी सवाल उपस्थित केले.
शासकीय विश्रामगृहातील दोन सूटच्या अंतर्गत सजावटीवर कथित १० ते १२ कोटी रुपये खर्च झाल्याचा दावाही त्यांनी केला. मालमत्ता व उत्पन्नाबाबतही अंधारे यांनी प्रश्न उपस्थित केले. या आरोपांबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांना संपर्काचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

Ladki Bahin Yojana August 2026 Installment GR : लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याचा GR आला; खात्यात 1,500 जमा होणार की 3,000 शासन निर्णयात नेमकं काय?

Vinod Kambli ने ठाण्याच्या हॉस्पिटलमधून पोस्ट केला Video; प्रकृतीबाबत सांगायचं सोडून, काय बोलतोय ऐका; नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Live Update : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; २२ तासांपासून विसर्जन मिरवणूक, थोड्याच वेळात बाप्पाला निरोप

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

SCROLL FOR NEXT