पुणे

उदयनराजे, गोरेंच्या भेटीची चर्चा

CD

जयकुमार गोरेंचे उदयनराजेंसमवेत गुप्‍तगू

जलमंदिर पॅलेसमध्‍ये सदिच्‍छा भेट; मतांच्‍या बेरजेसाठी तासभर चर्चा

सातारा, ता. ३० : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांत खलबते सुरू आहेत. आज ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांत निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयांवर तासभर चर्चा झाली. मतांच्या बेरजेसाठी ही भेट असल्याची चर्चा मात्र, जिल्ह्यात रंगली होती.
जिल्हा बॅंकेच्या मतदानासाठी केवळ एक दिवस उरला आहे. त्यामुळे मतांची बेरीज करून सेफ होण्यासाठी सर्वच प्रमुख लढती असलेल्या नेत्यांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांची ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी आज भेट घेतली. यावेळी आमदार धैर्यशील कदम, महायुती समन्वयक सुनील काटकर, विराज शिंदे, विठ्ठल बलशेटवार, विनीत पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा झाली. ग्रामविकासमंत्री गोरे यांनी मतांच्या बेरजेसाठी ही भेट घेतल्याची चर्चा रंगली होती.
............................
चौकट
निदान भत्ता तरी चालू ठेवा...
जिल्हा बॅंकेच्या कार्यकारी समितीची सभा आज झाली. या सभेसाठी खासदार उदयनराजे भोसले उपस्थित राहिले. संचालक मंडळाच्या सभागृहात गेल्यावर ते थेट अध्यक्षांच्या खुर्चीत जाऊन बसले. त्यावेळी सर्व संचालकांच्या उपस्थितीत खासदार उदयनराजेंनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांना ‘निदान आमचा भत्ता तरी चालू ठेवा,’ असे म्हणताच एकच हशा पिकला. यावेळी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष अनिल देसाई, प्रभाकर घार्गे, दत्तानाना ढमाळ, प्रदीप विधाते, शिवरूपराजे खर्डेकर, राजेंद्र राजपुरे, कांचन साळुंखे, ऋतुजा पाटील, तसेच संचालक व अधिकारी उपस्थित होते.
............................................
PNE26W62956
सातारा : जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासमवेत मंत्री जयकुमार गोरे, त्यावेळी धैर्यशील कदम, सुनील काटकर, विराज शिंदे, विठ्ठल बलशेटवार, विनीत पाटील आदी.
...............................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश! शेंदूरवाड्यात १० केव्हीचा नवीन ट्रान्सफॉर्मर सुरू; शेतकऱ्यांना आता आठ तास वीजपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा

Rafale Marine : भारतीय नौदलाच्या हवाई सामर्थ्यात भर! आयएनएस विक्रांतवर राफेल मरीनचे यशस्वी लँडिंग

Marathi News Live Updates : माजी मंत्री तानाजी सावंतांच्या कार्यकर्त्याकडून रविराज साबळे यांना घरात घुसून जिवे मारण्याची धमकी; दिवाळी किट वाटपावरून वाद!

RO-KO ची न्यूझीलंडमध्ये जोरदार तयारी! BCCI ने विराट-रोहितचा शेअर केला खास Video; कधी सुरू होणार वनडे मालिका?

Amit Shah: संसदेत होणार 'आर-पार'ची लढाई! 'मत चोरी'च्या मुद्द्यावरुन अमित शाहांचं राहुल गांधींसह अखिलेश यादवांना आव्हान

SCROLL FOR NEXT