पुणे

भारतीय वंशाच्या व्यक्तींवर अमेरिकेत कारवाई

CD

ह्यूस्टन, ता.१८, (पीटीआय) : अमेरिकेतील भारतीय वंशाच्या दोन व्यक्तींना स्वतंत्र इमिग्रेशन प्रकरणांत ताब्यात घेण्यात आल्याने ट्रम्प प्रशासनाच्या वाढत्या हद्दपारी आणि इमिग्रेशनविषयक कठोर कारवाईची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. यातील एक जॅझ गिटारवादक, तर दुसरी ग्रीन कार्डधारक ज्येष्ठ महिला आहे.
नवी दिल्ली येथे जन्मलेले जॅझ गिटारवादक आणि शिक्षक प्रीतेश वालिया हे या महिन्याच्या सुरुवातीला लॉस एंजेलिसला परतल्यानंतर अमेरिकेच्या ‘इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट’ (आयसीई) विभागाने ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना ॲडेलांटो येथील ‘आयसीई’ प्रक्रिया केंद्रात नेण्यात आले. वालिया यांनी इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून ही माहिती दिली. मात्र, त्यांच्याकडे कोणता व्हिसा होता आणि नेमके कोणत्या कारणामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वालिया यांनी १४ दिवस कोठडीत राहिल्यानंतर जामिनावर सुटका झाल्याचे सांगितले. शनिवारी (ता.१५) प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत त्यांनी आपले इमिग्रेशन प्रकरण अद्याप सुरू असल्याचे स्पष्ट केले.

आजींवरही कारवाई
दुसरे प्रकरण नरसमअम्मा वासमशेट्टी यांचे आहे. त्या २०१३ पासून अमेरिकेच्या कायदेशीर कायमस्वरूपी रहिवासी (एलपीआर) आहेत. त्यांच्याकडे ग्रीन कार्ड आहे. ११ ऑगस्ट रोजी उत्तर कॅरोलिनामध्ये ‘आयसीई’च्या नियोजित तपासणीसाठी हजर झाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. अमेरिकेच्या सरकारने त्यांच्याविरुद्ध सुरू केलेली हद्दपारीची प्रक्रिया काही महिन्यांपूर्वीच इमिग्रेशन न्यायाधीशांनी फेटाळली होती. वासमशेट्टी या उत्तर कॅरोलिनामध्ये विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांबरोबर काम करतात. त्यांचा दोन्ही मुले आणि दोन नातवंडे अमेरिकेचे नागरिक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT