मोरगाव, ता. १६ : नांदेड, धाराशीव येथील शेतकऱ्यांची जेसीबी मशिन भाड्याने घेऊन ते पुरंदर येथे होणाऱ्या विमानतळ कामाकरिता लावतो, असे खोटे सांगून करारनामा करून त्या जेसीबी वाहनांची विक्री करणाऱ्या चौघांचा सुपे (ता. बारामती) पोलिसांनी पर्दाफाश केला असून एकास अटक करण्यात आली आहे.
नीलेश अण्णा थोरात (रा. मोरगाव, ता. बारामती) असे अटक करण्यात आलेल्याचे तर अजय संतोष चव्हाण (रा. सरताळे ता. जावळी जि. सातारा), दिनेश भाऊराव मोरे (रा. इकलीबोर ता. नायगाव जि. नांदेड), तुषार शहाजी शिंदे (रा.येडशी ता. जि. धाराशीव असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर बालाजी गोविंदराव गादेवाड यांनी फिर्याद दिली आहे. शेतकरी गादेवाड यांच्यासह अनिल शिवाजी वरखडे, बाबूराव पांढरे, अप्पाराव पांढरे यांच्याशीही आरोपींनी १०० रुपयांच्या स्टॅम्पवर करार करून त्यांना तुमचे जेसीबी सासवड येथील नव्याने होणाऱ्या विमानतळाचे कामावर लावतो म्हणून आमिष दाखवले. विमानतळ येथील डेव्हलपिंगचे काम आमचे बी.जी. कंस्ट्रक्शन कंपनीला मिळाले आहे मग तुमचे जेसीबीचे प्रति महिना एक लाख रुपये प्रमाणे भाडे देतो असे सांगून आरोपींनी शेतकऱ्यांची फसवणूक केली. अजय चव्हाण, नीलेश थोरात, दिनेश मोरे, तुषार शिंदे यांनी संगनमताने डिसेंबर २०२५ मध्ये शेतकऱ्यांकडून खोटे कारण सांगून जेसीबी मशिन विक्री करण्याच्या उद्देशाने सुपे येथे घेऊन आले. पोलिसांनी त्याबाबत करारनामा तसेच आरोपींनी बनावटीकरण करून तयार केलेले बी.जी. कंस्ट्रक्शन कंपनीचे बनावट कागदपत्रे तपासामध्ये हस्तगत केली आहेत.
आरोपी थोरात जेसीबीची विक्री करून त्याची विल्हेवाट लावीत असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. धाराशीव येथील दोन ट्रॅक्टर तसेच नांदेड येथील तीन जेसीबी त्याच्याकडून हस्तगत करण्यात आले. ही कारवाई सुपेचे साहाय्यक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जिनेश कोळी, पोलिस हवालदार राहुल भाग्यवंत, संदीप लोंढे, रूपेश सांळुखे, दत्ता धुमाळ, संतोष पवार, विशाल गजरे, किसन ताडगे, महादेव साळुंखे, तुषार जैनक, सागर वाघमोडे, निहाल वणवे, सचिन कोकणे, सचिन दरेकर, योगेश सरोदे, पियुष माळी, आदेश मवाळ यांनी केली आहे.
७७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
आरोपी थोरात यास पोलिसांनी अटक केली असून तपासा दरम्यान दोन ट्रॅक्टर मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील शेतकऱ्यांना फायनान्स कंपनीचे ट्रॅक्टर असल्याचे सांगून त्याचे कागदपत्रे थोड्याच दिवसांत देतो असे सांगून ट्रॅक्टर विकी केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. अफरातफर प्रकरणातील तीन जेसीबी मशिन, २ ट्रॅक्टर असा ७७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जिनेश कोळी करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.