पुणे

जेजुरीत महिलांना मोफत संगणक प्रशिक्षण

CD

जेजुरी, ता. २१ : महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश संघटक व जेजुरी नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा अमृता संदिप घोणे यांच्या पुढाकारातून महिलांसाठी ए आय व सायबर सुरक्षा यावर आधारित १५ दिवसांचे मोफत संगणक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. हे प्रशिक्षण क्रिएटिव्ह कॉम्प्युटर्स, जेजुरी यांच्या माध्यमातून राबविण्यात आले.
क्रिएटिव्ह कॉम्प्युटर्सचे संचालक भानुदास कोलते, रोहित कळमकर व अनिता भोईटे यांच्या सहकार्याने हे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी महिलांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी महिलांनी उपक्रमाचे कौतुक केले.
आजच्या आधुनिक काळामध्ये प्रसार माध्यमांचा योग्य वापर करण्यासाठी महिलांना देण्यात आलेल्या या प्रशिक्षणासाठी अमृता घोणे व भानुदास कोलते यांचे आभार व्यक्त केले.
आधुनिक तंत्रज्ञानामध्ये महिलांना सजग व प्रगत राहण्यासाठी ए आय व सायबर सिक्युरिटी वर आधारित १५ दिवसांचे संगणक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्या नंतर पहिल्या वर्गातील महिलांना घोणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. महिलांना या प्रशिक्षणाचा उपयोग लघु व्यवसाय व सुरक्षिततेसाठी करणार असल्याची ग्वाही दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather: मुंबईला प्रदूषणाचा विळखा! हवेचा दर्जा खालावला; धोक्याची पातळी ओलांडल्याने आरोग्यतज्ज्ञांचं महत्त्वाचं भाकीत

Crime: लग्नाआधीच मेहंदी समारंभावेळी दोन्ही बहिणींनी जीवन संपवलं; एक तांत्रिक संबंध समोर; मृत्यूचं नेमकं गूढ काय?

बापरे! लिव्हर कॅन्सरनंतर दीपिकाच्या पोटात निघाली गाठ, अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आता मला खूप जास्त भीती...'

Sangli Miraj Crime : घरखर्चासाठी पोटच्या दोन मुलांची चाळीस हजारांत विक्री, मिरजेतील महिलेचे कृत्य; संशयित मनपाच्या रुग्णालयातील

India Brazil Trade: ब्राझीलकडून मिळणार खनिजे; संरक्षण क्षेत्रातील सहकार्यालाही आणखी बळ

SCROLL FOR NEXT