पुणे

जेजुरी परिसरात महास्वच्छता अभियान

CD

जेजुरी, ता. ३ ः श्री मार्तंड देवस्थान जेजुरी, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व वनविभाग, जेजुरी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने महास्वच्छता अभियान अंतर्गत श्री मार्तंड देवस्थान परिसर व लागून असलेले वनक्षेत्र, वनउद्यान, जेजुरी गड ते कडेपठार जाणारा रस्ता या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी पाच ट्रक्टर कचरा गोळा करण्यात आला.
महाराष्ट्र भूषण डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉ. दत्तात्रेय नारायण तथा अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने आणि डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान (ता. अलिबाग, जि. रायगड) यांच्या मार्फत खंडोबा गडावर महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या महास्वच्छता अभियानामध्ये सुका कचरा व ओला कचरा जमा करण्यात आला, संपूर्ण परिसरातून एकूण १९६ सदस्य सहभागी झाले होते. यावेळी देवसंस्थानचे अध्यक्ष मंगेश घोणे, विश्वस्त पोपट खोमणे, वनअधिकारी सागर ढोले उपस्थित होते. या अभियानात एकूण ७०-८० स्वयंसेवक आणि वनविभाग अधिकारी कर्मचारी, जेजुरी नगरपरिषद कर्मचारी, देवस्थान प्रतिनिधी, देवस्थान परिसरातील दुकानदार यांनी सहभाग नोंदवला.

03664

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon News : मालेगावच्या दरेगाव शिवारात 'विषाचा' धूर! अवैध प्लास्टिक कारखान्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

IPL 2026 Updates: गतविजेत्या RCB चे सामने मुंबईनंतर पुण्यातही नाही होणार! ५ सामने एकीकडे, तर २ दुसरीकडे; जाणून घ्या ब्रेकिंग न्यूज

Gunratna Sadavarte: 'राज ठाकरे रंग बदले, उद्धव संग मंच पे चढले...' गुणरत्न सदावर्ते यांची होळीनिमित्त राजकीय कविता; Video Viral

Video: ७० वर्षांच्या जावयाची गाढवावरुन मिरवणूक; तरुण जावई पळून गेला अन्...

स्मृती मानधना जगात नंबर १! ODI Ranking मध्ये भारतीय बॅटरची झेप, चार वर्षांनी गोलंदाजीतील इक्लेस्टोनचं सिंहासन खालसा

SCROLL FOR NEXT