Pune Crime  sakal
पुणे

Pune Crime : जेजुरीचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे खुन प्रकरणातील आरोपीला वाघोलीत अटक

खुनातील एका मारेकऱ्यास गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने वाघोलीत अटक केली.

सकाळ डिजिटल टीम

Pune Crime – जेजुरीचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांच्या खुनातील एका मारेकऱ्यास गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने वाघोलीत अटक केली. दत्ता मारुती मळेकर ( वय 45 वर्ष,रा. गुरुवार पेठ, महाराणा प्रताप रोड, पुणे ) असे अटक केलेल्या मारेकर्याचे नाव आहे. 7 जुलै रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक महेबुब सय्यदलाल पानसरे यांचा जमीनीच्या वादातुन जेजुरी येथे निर्घृण खुन करण्यात आला होता.या गुन्ह्यातील आरोपी मळेकर वाघोली येथील गायरान परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट सहाला मिळाली होती.

युनिट सहाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांनी पथक तयार करून त्याला पकडण्याची मोहीम हाती घेतली होती. त्याला गायरान परिसरात ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता गुन्ह्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याची माहिती मिळाली. त्याला पुढील कारवाई साठी जेजुरी पोलिसांकडे ताब्यात देण्यात आले आहे.

गुन्हे शाखा युनिट सहाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, पोलीस कर्मचारी मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंडे, संभाजी सपटे, प्रतीक लायगुडे, रमेश मेमाणे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, अश्फाक मुलानी, ज्योती काळे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर यांनी ही कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, Video: बुमराह आला अन् दुसऱ्याच बॉलवर विकेट घेतली! भुवनेश्वर कुमारच्या पंक्तीत मिळवलं स्थान

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? सौदीची पाइपलाइन बंद, फक्त ५ ते ७ दिवसांचा तेलसाठा शिल्लक

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

SCROLL FOR NEXT