जेजुरी, ता. २१ : जेजुरीनगरीत कार्यरत असलेल्या जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संघटनेने विविध सामाजिक व सार्वजनिक उपक्रमांसाठी ज्येष्ठ नागरिक भवनासमोर जागा खरेदी केली आहे. या जागेवर लोकसहभागातून नवीन इमारत उभारण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष श्याम पेशवे यांनी दिली.
जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संघटनेची स्थापना २००१ मध्ये जेजुरी येथे झाली. सन २०१० मध्ये तत्कालीन खासदार शरद पवार यांच्या निधीतून होळकर तलावाकाठी ज्येष्ठ नागरिक भवनाची दोन मजली इमारत उभारण्यात आली. या भवनात वर्षभर विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये व्याख्याने, आरोग्य शिबिरे, गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार, ग्रंथालय, विविध स्पर्धा तसेच दशक्रिया विधीनिमित्त कार्यक्रमांचा समावेश आहे.
ज्येष्ठ नागरिक भवनातील उपलब्ध जागा अपुरी पडत असल्याने जेजुरी तसेच पंचक्रोशीतील नागरिकांसाठी दशक्रिया विधीनिमित्त होणारे कार्यक्रम आणि अन्य सामाजिक उपक्रम आयोजित करण्यासाठी नवीन जागा खरेदी करण्यात आली आहे. या जागेवर लोकसहभागातून नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पेशवे यांनी केले.
जागा खरेदीसाठी अध्यक्ष पेशवे, उपाध्यक्ष पांडुरंग कोरपड, उषा आगलावे, सचिव मोहिनी धोत्रे, नंदकुमार निरगुडे, सुरेश पवार, सुहास बारभाई, आनंदराव जगताप, हरिश्चंद्र कराळे, बाबूराव जगताप, सयाजी मोहरकर, माणिक पवार आदी सभासदांनी प्रयत्न केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.