पुणे

तक्रारवाडी टोलनाक्यावर स्थानिकांना सवलत

CD

जेजुरी, ता. २१ : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर तक्रारवाडी (ता. पुरंदर) फाट्याजवळ केलेल्या टोलनाक्यावर वीस किलोमीटर अंतराच्या परिसरातील वाहनचालकांना सवलत देणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे विभागाचे प्रकल्प अधिकारी संजय कदम, अभिजित आवटे यांनी सांगितले.
याबाबत संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष संदीप जगताप, माजी प्रमुख विश्‍वस्त शिवराज झगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेजुरी शहराध्यक्ष रमेश लेंडे, बहुजन हक्क परिषदेचे शहराध्यक्ष यशवंत दोडके यांनी सासवड-जेजुरी महामार्गावर तक्रारवाडी फाट्याजवळ नव्याने निर्माण केलेल्या टोलनाक्यावर पुरंदरवासीयांना टोलमाफी मिळावी याबाबत निवेदन देत पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने शुक्रवारी (ता. २०) पुणे येथील कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी नीलेश जगताप, रमेश लेंडे, शिवराज झगडे, यशवंत दोडके, संदीप जगताप आदी उपस्थित होते.
तक्रारवाडीचा टोलनाका बेलसर गावच्या हद्दीत येतो. मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत वाहन चालकांकडून टोलवसुलीस प्रारंभ होणार आहे. पुरंदर तालुक्यातील २० किलोमीटर परिसरातील नागरिकांना ३५० रुपयांचा मासिक पास देण्यात येणार आहे, यामध्ये या टोलनाक्यावरून दिवसातून अनेक वेळा ये-जा करता येणार आहे. त्यासाठी आधारकार्ड आणि फास्ट टॅग ऑनलाइन करून घ्यावे लागणार आहे. केंद्र शासनाच्या
धोरणानुसार ३ हजार रुपयांचा वार्षिक पास घेतल्यास प्रत्येक टोलनाक्यावर फक्त १५ रुपये फास्टटॅग मधून वजा होणार आहेत. टोलनाका सुरू करण्यापूर्वी पुन्हा एकदा बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather: मुंबईला प्रदूषणाचा विळखा! हवेचा दर्जा खालावला; धोक्याची पातळी ओलांडल्याने आरोग्यतज्ज्ञांचं महत्त्वाचं भाकीत

Crime: लग्नाआधीच मेहंदी समारंभावेळी दोन्ही बहिणींनी जीवन संपवलं; एक तांत्रिक संबंध समोर; मृत्यूचं नेमकं गूढ काय?

बापरे! लिव्हर कॅन्सरनंतर दीपिकाच्या पोटात निघाली गाठ, अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आता मला खूप जास्त भीती...'

Sangli Miraj Crime : घरखर्चासाठी पोटच्या दोन मुलांची चाळीस हजारांत विक्री, मिरजेतील महिलेचे कृत्य; संशयित मनपाच्या रुग्णालयातील

India Brazil Trade: ब्राझीलकडून मिळणार खनिजे; संरक्षण क्षेत्रातील सहकार्यालाही आणखी बळ

SCROLL FOR NEXT