पुणे

Pune Jeryln Dsilva Assaults: बाणेर-पाषाण रोडवर थरारक घटना; डिजिटल कन्टेट क्रिएटर महिलेला पाठलाग करुन बेदम मारहाण

यामध्ये नाकातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत असल्याचं तिच्या व्हिडिओतून समोर आलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुण्यातील बाणेर-पाषाण रोडवर एका डिजिटल कंटेन्ट क्रिएटर महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या महिलेचा दोन किमीपर्यंत पाठलाग करुन तिला मारहाण करण्यात आली. यामध्ये तिच्या नाकातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत असल्याचं तिच्याच व्हिडिओतून समोर आलं आहे. आपल्यावर ओढवलेल्या या बिकट प्रसंगाची माहिती तीनं या व्हिडिओतून दिली आहे. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस तपास करत आहेत. साम टीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे.

जेरलिन डिसिल्वा असं या महिलेचं नाव आहे. इन्स्टाग्रामवर या महिलेचे 70,000 हून अधिक फॉलोअर्स आहेत. बाणेर-पाषाण लिंक रोडवरुन दोन लहान मुलांना घेऊन बाईकवर चाललेली असताना ही घटना घडली आहे. एका कार चालकानं तिला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, यावेळी जेरलिन यांना तिची दुचाकी बाजूला घेण्यास सांगितलं. यावेळी आरोपी ड्रायव्हरनं आपली कार थांबवली आणि खाली उतरुन त्यानं जेरिन यांच्या चेहऱ्यावर जोरदार ठोसा दिल्यानं तिच्या नाकातून रक्तस्त्राव झाला. जेरिनसोबत असलेल्या दोन लहान मुलांसमोर या अज्ञात कारचालकानं तिला मारहाण केली तसेच तिचे केसही ओढले.

या घटनेनंतर जेरलिन यांनी सोशल मीडियावर तात्काळ व्हिडिओ पोस्ट केला. यामध्ये त्यांनी आपल्याबाबत घडलेल्या थरारक घटनेची माहिती दिली. यामध्ये त्यांनी सांगितलं की, आपल्याला मारहाण होण्यापूर्वी मारहाण करणारा कार चालक आपल्या वाहनाचा सुमारे 2 किलोमीटरपासून पाठलाग करत होता. या घटनेनंतर जखमी झालेल्या जेरिनला बाणेर इथल्या एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून तपास सुरु करण्यात आला आहे. यामध्ये मारहाण करणारा आरोपी नेमका कोण आहे? त्याचं नाव आणि वय काय? तो कुठला रहिवासी आहे. ही माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT