पुणे

जेऊर येथील 10.5 कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना वीज जोडणी अभावी ठप्प; अडचणीच्या काळात विशेष बाब म्हणून सहकार्य करण्याची ग्रामस्थांची मागणी

CD

JEU26B08503
जेऊर (ता. अक्कलकोट) : येथील तयार असूनही वापरात नसलेले जलशुद्धीकरणगृह.
---
वीज जोडणीअभावी
जेऊरची १०.५ कोटींची पाणी योजना रखडली
जलशुद्धीकरण केंद्र तयार; थकबाकीमुळे महावितरणकडून जोडणीसाठी कोटेशनच नाही
राजशेखर चौधरी : सकाळ वृत्तसेवा
​अक्कलकोट, ता. १२ : जेऊर (ता. अक्कलकोट) येथील गाव, तांडे आणि वाढीव वस्त्यांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत सुमारे १०.५ कोटी रुपये खर्चाची नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली आहे. हिळ्ळी येथील भीमा नदीपासून १९.५ किलोमीटर लांबीची पाइपलाइन, पाण्याच्या टाक्या आणि जलशुद्धीकरण केंद्राची कामे पूर्ण होऊन चाचणीही झाली आहे. मात्र, हिळ्ळी येथील जॅकवेल आणि जेऊर येथील जलशुद्धीकरण केंद्रासाठी नवीन वीज जोडणी आवश्यक आहे. थकबाकीचे कारण देत महावितरणने अद्याप कोटेशन दिले नसल्याने ऐन तीव्र पाणीटंचाईच्या काळात ही योजना सुरू होऊ शकली नाही.
हिळ्ळी बंधाऱ्याच्या वरच्या बाजूस असलेल्या जॅकवेलपासून जेऊरपर्यंत नवीन डक्टाइल आयर्नची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. तसेच १ लाख २५ हजार आणि २५ हजार लिटर क्षमतेच्या दोन पाण्याच्या टाक्या बांधून पूर्ण झाल्या आहेत. दररोज १२.५ लाख लिटर पाणी शुद्ध करण्याची क्षमता असलेले जलशुद्धीकरण केंद्र आणि गावातील वितरण व्यवस्थेची कामेही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पूर्ण केली आहेत. या सर्व कामांची चाचणी घेण्यात आली आहे.
योजनेच्या अंतिम टप्प्यातील वीज जोडणी थकबाकीच्या कारणामुळे रखडली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि ग्रामपंचायत जेऊर यांनी महावितरणच्या सोलापूर येथील कार्यकारी अभियंत्यांकडे पत्राद्वारे जोडणीची मागणी केली आहे. मात्र, अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही.
सध्या जेऊरमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असताना, सर्व कामे पूर्ण झालेली योजना केवळ वीज जोडणीअभावी बंद राहणे ग्रामस्थांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. दुष्काळी परिस्थितीचा विचार करून महावितरणने थकबाकीच्या मुद्द्यावर लवचिक भूमिका घ्यावी आणि विशेष बाब म्हणून तातडीने वीज जोडणी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून महावितरणला आवश्यक निर्देश द्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
---
कोट

जेऊरची पाणीपुरवठा योजना लवकर सुरू व्हावी, यासाठी मागील आठवड्यात महावितरणला पत्र दिले आहे. टंचाईच्या काळात थकबाकीसाठी सवलत देऊन कोटेशन भरून घ्यावे, अशी मागणी केली आहे. त्याला होकार मिळताच पुढील प्रक्रिया करून योजना लवकर मार्गी लावली जाईल.
- सुनील देशपांडे, उपविभागीय अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

'त्या'व्हायरल व्हिडीओवर अखेर गौतमी पाटील बोलली, म्हणाली... 'लाज नाही वाटली?'

Latest Marathi News Live Update : काँग्रेस दिशाहीन, किरेन रिजिजू यांची टीका

Mumbai News: जीटीबीनगरवासीयांना भाड्याचा दिलासा! निवासींना २० तर गाळेधारकांना १० हजार रुपये

Pachod News : दावरवाडी परिसरातील सहा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रेच पडलीत आजारी!

SCROLL FOR NEXT