पुणे

सराफ व्यावसायिकांसह उंब्रजकरांच्या सुरक्षेला प्राधान्य : सहायक पोलिस निरीक्षक पंकज पवार लुटीच्या पार्श्वभूमीवर सराफ व्यावसायिकांची बैठक

CD

सराफ व्यावसायिकांना
सुरक्षेबाबत दिल्या सूचना

उंब्रज पाेलिस ठाण्यात बैठक; जनजागृतीचा निर्णय

उंब्रज, ता. २५ : येथे घडलेल्या दागिने लुटीच्या घटनेनंतर पोलिसांनी सुरक्षेसंदर्भात उपाययाेजना सुरू केल्या आहेत. सराफ व्यावसायिकांची बैठक घेऊन सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या असून, पुढील काळात विविध व्यावसायिक संघटना, तसेच युवक-युवती आणि शाळा-कॉलेज स्तरावरही जनजागृती बैठका घेण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.
येथील पोलिस ठाण्यात आज झालेल्या बैठकीत सहाय्यक पाेलिस निरीक्षक पंकज पवार यांनी सांगितले, की अलीकडील चोरीची घटना ही पूर्वनियोजित पाळत ठेवून केल्याचे प्राथमिक तपासात दिसून येते. या प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय पद्धतीने सुरू आहे. तांत्रिक व स्थानिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. पोलिसांबरोबरच व्यावसायिकांनीही स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. नाईट व्हिजन सीसीटीव्ही, प्रवेश-निर्गमन बिंदूंवर कॅमेरे, सामाईक सुरक्षारक्षक, मौल्यवान मालाची सुरक्षित ने-आण, गोपनीयता आणि सायरन प्रणाली यासारख्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
हा परिसर अधिक सुरक्षित कसा राहील, हा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी व्यापारी, युवक, युवती, शाळा-कॉलेज प्रशासन यांच्याशी समन्वय साधून नियमित बैठका घेण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे येथे सुरक्षाविषयक सजगता वाढण्यास मदत होणार आहे. पोलिस- नागरिक सहकार्याच्या बळावर गुन्हेगारीला आळा घालण्याचा निर्धार व्यक्त केला.

B00789
उंब्रज ः सराफ व्यावसायिकांच्या बैठकीत बाेलताना पंकज पवार. त्या वेळी मान्यवर.
...............................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: ब्रेकअप ही सामान्य बाब; प्रेमसंबंध तुटणे म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणे नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Thane News: मलंगगड फ्युनिक्युलरवरून नवा वाद! ‘ऑपरेटिंग सिस्टीम’ बेजबाबदार व्यक्तीकडे? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार

Palus Municipal Council : पलूस पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय; पाणी योजनेला मुदतवाढ, स्मशानभूमी दुरुस्तीला हिरवा कंदील

Jalgaon Smart Meter : जळगावकरांना महावितरणचा डिजिटल 'शॉक'! थकबाकीदारांची वीज आता परस्पर होणार खंडित

BMC Budget: मोफत स्टेशनरी, पदवीपर्यंत फी भरण्याची तरतूद अन्...; बीएमसीचा ₹४,२४८ कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प सादर, योजना काय आहेत?

SCROLL FOR NEXT