पुणे

मेडिकल, ज्वेलर्स दुकानाचे शटर उचकटून चोरी

CD

मेडिकल, ज्वेलर्स दुकानाचे शटर उचकटून चोरी
विजापूर नाका, एमआयडीसी पोलिसांत गुन्हे; ६३ हजारांचा ऐवज चोरी
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २३ : मागील महिनाभरात शहरात चोरी, घरफोडी, दुचाकी चोरी, ज्वेलर्स दुकान लुटणे, एटीएम मशीनच चोरून नेण्याचे गुन्हे घडले आहेत. यातील बहुतेक गुन्ह्यांचा तपासही पोलिसांनी लावला. पण, चोरीचे गुन्हे थांबलेले नाहीत. २१ जूनच्या मध्यरात्री एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीतील मेडिकल आणि विजापूर नाका पोलिसांच्या हद्दीतील ज्वेलर्स दुकानातून ५७ हजारांचे दागिने, रोकड चोरट्याने चोरून नेली आहे.
विजापूर नाका पोलिसांच्या हद्दीतील आनंद नगरातील आर. बी. ज्वेलर्स दुकानाचे शटर उचकटून चोरट्याने रोकड व दागिने, असा एकूण ५६ हजार ९०० रुपयांचा ऐवज लंपास केला. २१ जूनच्या मध्यरात्री ही चोरी झाली. या प्रकरणी ऋषिकेश राजेश भुमकर (रा. विजय देशमुख नगर, निर्मिती विहारजवळ, सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली. चोरट्याने मध्यरात्री कोणी नसल्याची संधी साधून शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कॅश काऊंटरमधील रोकड व लॉकेटचे सात नग, ब्रासलेटचे पाच नग, महिलांच्या छल्ल्याचे आठ नग, लेडिज रिंग सहा नग व एक पाचू व दोन राशी रत्ने चोरून नेली, असेही फिर्यादीत नमूद आहे. पोलिस हवालदार शिर्के तपास करीत आहेत.
--------------------
चौकट
श्रमिक कामगार नगरातील
मेडिकल दुकानात चोरी
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील श्रमिक कामगार नगरातील बंद मेडिकलचे शटर उचकटून चोरट्यांनी रेाकड चोरून नेली आहे. चिनू गंगाधर बल्ला (रा. व्यंकटेश नगर, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. २१ जूनच्या मध्यरात्री ही चोरी झाल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. मेडिकल बंद करून घरी गेल्यावर कोणी नसल्याची संधी साधून चोरट्याने मेडिकलचे शटर कशानेतरी उचकटले. आत प्रवेश करून गल्ल्यातील साडेसहा हजार रूपये चोरून नेले. पोलिस हवालदार भांगे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank News :ग्राहकांसाठी रविवारी बँका सुरू; २८ ते ३० सप्टेंबरच्या संपाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Nanded Farmers: ‘काजू-बदाम खा, पण शेतकऱ्यांना न्याय द्या’; अर्धापुरात काँग्रेसचा जनाक्रोश, घंटानाद करून दुष्काळ जाहीर

मुंबईकरांचा प्रवास सुसाट! ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्गासह 'ठाणे-बोरिवली'साठी दुय्यम कर्ज; सरकारचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा सप्टेंबर महिन्याचा पगार लवकर मिळणार

Ahilyanagar Tourism: अहिल्यानगरचा ‘काश्मीर’ म्हणतात ते उगाच नाही! लव्हाळवाडीचा निसर्ग पाहून तुम्हीही म्हणाल, ‘इथे एकदा जायलाच हवं’

SCROLL FOR NEXT