जिगाव प्रकल्पातील पाइप आगीप्रकरणी ‘सीआयडी’ चौकशीची मागणी
--
सार्वजनिक निधीच्या अपव्ययाचा माजी राज्यमंत्र्यांचा आरोप
ॲग्रोवन वृत्तसेवा
बुलडाणा : जिगाव प्रकल्पाच्या सिंचन योजनेसाठी साठवून ठेवलेल्या पाइपच्या आगाराला लागलेल्या भीषण आगीत कोट्यवधी रुपयांचे पाइप जळून खाक झाल्याच्या घटनेची सीआयडीमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी अमरावती येथे विशेष पोलिस महानिरीक्षकांना निवेदन सादर केले. या घटनेमुळे केवळ मोठे आर्थिक नुकसान झाले नसून, सार्वजनिक निधीच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तसेच शासकीय मालमत्तेच्या सुरक्षेची जबाबदारी आणि संबंधित विभागांच्या कार्यपद्धतीवरही शंका निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.
सदर पाइप कोणत्या विभागामार्फत खरेदी करण्यात आले, त्यांची साठवणूक कोणाच्या देखरेखीखाली होती आणि सुरक्षा व्यवस्था कोणाच्या अखत्यारित होती, याचा सखोल तपास होणे आवश्यक असल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे. याशिवाय या घटनेमागे निष्काळजीपणा, संगनमत किंवा भ्रष्टाचाराची शक्यता नाकारता येत नसल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आला आहे.
जनतेच्या करातून उभारण्यात आलेल्या निधीचा असा अपव्यय होणे ही गंभीर बाब असून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सावजी यांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि सखोल चौकशी सीआयडीमार्फत करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.