पुणे

जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण

CD

जिंतूरमधील आंदोलनाला हिंसक वळण
उपोषणकर्त्याच्या आत्मदहनाच्या प्रयत्नानंतर रास्तोरोको, जाळपोळ
जिंतूर (जि.परभणी) , ता.२१ : बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी येथे सुरू असलेल्या आंदोलनाला आज अचानक हिंसक वळण लागले. उपोषणकर्ते विनोद आडे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने आंदोलनस्थळी खळबळ उडाली. त्यानंतर संतप्त आंदोलकांनी अचानक रस्त्यावर उतरून ‘रास्ता रोको’ केले. यावेळी ट्रक, रिक्षा, स्कूल व्हॅनची तोडफोड करण्यात आली.
बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी विनोद आडे येथे अनेक दिवसांपासून उपोषण करीत आहेत. शासनाने मागणीबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे. आंदोलनस्थळी आज मोठ्या संख्येने नागरिक आले असता विनोद आडे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे समोर आले. या घटनेनंतर आंदोलनस्थळी गोंधळ निर्माण झाला आणि काही वेळेतच आंदोलकांनी अचानक ‘रास्ता रोको’ सुरू केले.
पोलिसांचा बंदोबस्त असतानाही आंदोलकांनी वाहतूक रोखल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची धावपळ उडाली. दरम्यान, संतप्त आंदोलकांकडून रस्त्यावरील ट्रक, रिक्षा तसेच एका स्कूल व्हॅनची तोडफोड करण्यात आली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे वाहनचालक, परिसरातील दुकानदार आणि नागरिकांत घबराट निर्माण झाली. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने घाईघाईने बंद केली. त्यामुळे काही काळ बाजारपेठेत शुकशुकाट पसरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिडकोचं घर स्वस्तात देतो सांगितलं, बनावट अलॉटमेंट लेटर दाखवून १.६० कोटींचा चुना; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

Gold Rate Today: ऐन दिवाळीत सोनं स्वस्त! धनत्रयोदशीनंतरही भाव घसरले; 10 ग्रॅमचा दर पाहून ग्राहकांची गर्दी, पाहा सोनं-चांदीचे ताजे भाव

IND vs NZ 2nd ODI Live : शुभमन गिल, हे काय केलंस... लोकेश राहुलसह सर्वच अचंबित; डॅरिल मिचेल तंबूच्या दिशेने निघालाच होता, पण.. Video Viral

Elephant Maya: ‘माया’च्या मदतीला अंबानींची ‘वनतारा’; केरळहून हवाई मार्गाने जामनगरमधील उपचार केंद्रात दाखल

Latest Marathi News Live Update : दोन दिवसांच्या उपचारांनंतर शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

SCROLL FOR NEXT